क्राईम न्युजजिल्हामहाराष्ट्र

यवत गाव कडकडीत बंद! छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड ; ग्रामस्थांचा संताप, सर्वत्र तीव्र निषेध…

पोलीस प्रशासनाची प्रतिक्रिया पहा व्हिडिओ...

पुणे (दौड) : (दि.२६ जुलै २०२५) दौंड तालुक्यातील यवत स्टेशन परिसरात असलेल्या नीलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार घडली होती. ही घटना सकाळी अंदाजे ४.३० ते ५.३० या वेळेत घडली असून, एका समाजकंटकाने ही हरकत घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर गावात तणाव, कडकडीत बंद…

या घटनेनंतर यवत गावात तणाव निर्माण झाला असून, ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवत तीव्र संताप व्यक्त केला आहे. बाजारपेठा, शाळा, वाहतूक पूर्णत: ठप्प आहे. सर्व समाज, संघटना, राजकीय पक्ष व नागरिकांनी एकत्र येत या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

पोलीस कारवाई – आरोपीवर गुन्हा दाखल…

ही माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ मूळ पुतळा परिसर पंचनामा करून दंगल प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. पोलिसांनी “जिहादी मानसिकतेच्या” इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

ग्रामस्थ आणि समाजप्रेमींचा आवाज…

घटनेनंतर ग्रामस्थांत तीव्र भावना उमटल्या असून, अनेकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. शिवप्रेमी, सामाजिक संघटना, राजकीय प्रतिनिधी आणि युवकांनी प्रशासनाकडे आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. गावात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी, नागरिक कठोर कारवाईच्या मागणीवर ठाम आहेत.

प्रशासन सजग – बंदोबस्त वाढवला…

परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, पोलीस निरीक्षकांच्या देखरेखीखाली गस्त आणि नजर ठेवली जात आहे. सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

“ही फक्त मूर्ती नव्हे, आमच्या अस्मितेवर घाव!” – स्थानिक नागरिकांचा संतप्त सवाल…

स्थानिक शिवभक्तांचे म्हणणे आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. त्यांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे आमच्या अस्मितेवर केलेला घाव आहे. आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.”

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??