
संपादक सुनिल थोरात
पुणे (हडपसर) : आजचा विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित राहू शकत नाही. भविष्यातील जग हे डिजिटल, डेटा-संचालित आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणे हे आपल्या शाळेचे व शिक्षक वर्गाचे कर्तव्य आहे.
याच उद्देशाने साधना विद्यालयात (‘AI Artificial Intelligence) कृत्रिम बुद्धीमत्ता अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.शिक्षकांनी बदलत्या तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून स्वतःला सक्षम करावे व त्याचे धडे विद्यार्थ्यांना द्यावेत असे प्रतिपादन शिक्षकांना मार्गदर्शन करताना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
या प्रशिक्षणात शिक्षकांना A.I म्हणजे काय ? आणि ते आपल्या जीवनात कसे कार्य करते? रोबोटिक्स, मशीन लर्निंग,आणि डेटा विश्लेषणाची मूलतत्त्वे ,छोटे A I प्रोजेक्ट्स, जसे की स्मार्ट असिस्टंट, चॅटबॉट्स, A I चा समाजावर होणारा परिणाम व नैतिक जबाबदाऱ्या, याबाबत विद्यालयातील २२ शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. व प्रशिक्षणार्थी शिक्षक येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना A.I अभ्यासक्रमाचे धडे देणार आहेत.
या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, साधना सुर्वे, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे, A.I संस्था तज्ज्ञ मार्गदर्शक प्रतापराव गायकवाड, पंकज गोसावी व तुषार क्षीरसागर, प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते.



