महिलांना मोफत शिलाई मशीन किंवा खात्यात १५ हजार ; पण फसवणुकीपासून सावध रहा!

पुणे : गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वंयरोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशानं पंतप्रधान फ्री शिलाई मशीन योजना (PM Free Sewing Machine Scheme) सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन किंवा शिलाई मशीन खरेदीसाठी १५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
मात्र, या योजनांच्या नावाखाली फेक वेबसाईट्स आणि बोगस संस्थांचा सुळसुळाट झाल्याने अनेक महिला फसवल्या जात असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन अशा संस्थांची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी समाजातून होत आहे.
पात्रतेच्या अटी घ्या जाणून…
1️⃣ अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.
2️⃣ वय २० ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.
3️⃣ महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असावी.
4️⃣ वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असावे.
5️⃣ विधवा व दिव्यांग महिलांना विशेष प्राधान्य.
6️⃣ काही प्रकरणांमध्ये शिलाई कामाचं प्रमाणपत्र आवश्यक.
7️⃣ शासनाकडूनच १५ हजारांची मदत थेट खात्यात जमा केली जाते.
अर्जाची प्रक्रिया कशी असेल…
या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो. महिलांनी केंद्र सरकारची अधिकृत वेबसाइट https://pmvishwakarma.gov.in येथे अर्ज करावा. ऑफलाईन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे — आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, रेशनकार्ड, फोटो, मोबाईल नंबर आणि आवश्यक असल्यास मृत्यू प्रमाणपत्र / अपंगत्व प्रमाणपत्र / शिलाई कोर्सचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. योजनेच्या नियमांनुसार एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला लाभ मिळू शकतो.
बनावट वेबसाईट्स पासून व संस्थांपासून सावध!
योजनेच्या नावाखाली फेक लिंक पाठवून किंवा अर्ज फीच्या नावाखाली पैसे उकळणारे टोळके सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे.
फ्री शिलाई मशीन देण्याचे आश्वासन देऊन अनेक महिलांकडून पैसे उकळणाऱ्या फसवणूक प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
अशा बोगस संस्थांविरुद्ध प्रशासनानं तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व समाजसंस्था करत आहेत.
प्रशासनाला आवाहन…
फ्री शिलाई मशीनच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची माहिती नागरिकांनी त्वरित स्थानिक पोलीस ठाणे किंवा जिल्हा प्रशासनाला द्यावी. खऱ्या सरकारी योजनेची माहिती केवळ अधिकृत वेबसाईट आणि महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयातच उपलब्ध असते, हे नागरिकांनी लक्षात ठेवावे.
निष्कर्ष…
शासनाच्या उद्देशाने महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न असताना, फसवणूक करणारे टोळके त्याचं रूपांतर लुबाडणुकीत करत आहेत.
“मोफत शिलाई मशीन” किंवा “१५ हजार रुपये खात्यात” या नावाखाली कोणीही पैसे मागत असेल, तर तो सरळ फसवणुकीचा प्रकार आहे.
अशा फसव्या संस्थांचा पर्दाफाश करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी — हीच जनतेची मागणी!
Editer sunil thorat



