१३ लाख ३० हजार रुपये देण्यास टाळाटाळ, गुन्हा दाखल, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के यांच्याकडे तपास…
१३ लाख ३० हजार रुपयांची फसवणूकीचा गुन्हा दाखल...कदमवाकवस्ती...

संपादक सुनिल थोरात
पुणे (हवेली) : भागीदारी केल्यानंतर हस्तकला व्यवसायात जादा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी व्यावसायिकाला १३ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घातल्याची घटना कदमवाकवस्ती येथे घडली.
याप्रकरणी श्रीपाद जयवंत बळप (वय-३९, रा. ओंकार निवास, शिक्षक कॉलनी, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोईन मुन्नई खान (सध्या रा.समतानगर, कदमवाकवस्ती ता. हवेली जि.पुणे, मुळ रा.घर नंबर ७९६/७ पुराणा रसुलपुर, फिरोजाबाद, उत्तरप्रदेश) व अब्दुल कलीम खान फैजुल्लाखान (सध्या रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे मुळ रा. जलाली मोहल्ला, मडगाव, जि. जळगाव). यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत १४ जुलै २०२३ ते २० एप्रिल २०२५ या कालावधीत घडली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीपाद बळप आणि मोईन खान व अब्दुल कलीम खान हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तर आरोपी हे पोलपाट, चाळण, पिंजरे विक्रीचा होलसेल व्यवसाय करतात. तसेच बांगड्या सुद्धा बनवितात. त्यांनी बळप यांना या हस्तकला व्यवसायात खुप फायदा आहे. तुम्ही यामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला यामध्ये व्यवसायामध्ये भागीदारी देतो. असे सांगितले.
यांवर बळप यांनी विश्वास ठेवून त्यांना चेक व आरटीजीएसद्वारे २० लाख ६३ हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांनी बळप यांना गुंतवणुक करण्यास सांगितले. ७ लाख ३३ हजार रुपये रक्कम परत दिली. परंतु उर्वरीत १३ लाख ३० हजार रुपये दिले नाहीत.
श्रीपाद बळप यांनी त्यांचेकडे गुंतवलेल्या रकमेची मागणी केली असता त्यांनी सदर रक्कम देण्यास टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बळप यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणूकीची तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.



