जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतचा निर्णय धडाकेबाज! सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यावर ५ हजारांचा दंड आणि गुन्हा दाखल…

पुणे (हवेली) : (ता. ३१ जुलै) कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत आता ‘अ‍ॅक्शन मोड’ मध्ये आली असून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर गाव विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करून ५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती उपसरपंच नसीर पठाण यांनी दिली. गाव स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ग्रामपंचायतीने गावकऱ्यांसमोर स्पष्ट संदेश दिला आहे. “कचरा टाकला तर शिक्षा ठरलेली!”

मासिक सभेत सर्वानुमते निर्णय…

कदमवाकवस्तीची मासिक सभा मंगळवारी (ता. २९) पार पडली. यामध्ये पॅनेल प्रमुख चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच गौरी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, अविनाश बडदे, सलीमा पठाण, सुनंदा काळभोर, सिमिता लोंढे, मंदाकिनी नामुगडे, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. त्यानंतर ग्रामपंचायतीने सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स लावून दंड आणि गुन्ह्याबाबत जनजागृती केली आहे.

कचरा व्यवस्थापन योजना सुरुच, तरीही अडथळे…

गेल्या चार महिन्यांपासून स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ओला-सुका कचऱ्याचे संकलन सुरू आहे. यासाठी प्रत्येक घरकुटुंबाकडून दरमहा ६० रुपये, तर हॉटेल्सकडून १५० रुपये शुल्क घेतले जाते. कचरा गोळा करून वर्गवारी केली जात असून गाव स्वच्छतेकडे वाटचाल होते आहे. पण काही नागरिक या योजनेला साथ न देत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत आहेत. यामुळे ग्रामपंचायतीने आता कठोर भूमिका घेतली आहे.

शाळेच्या परिसरात टवाळखोरांचा धिंगाणा…

ग्रामपंचायतीच्या शेजारील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात टवाळखोर मुले दररोज रात्री सिगारेट, गुटखा, दारूच्या बाटल्यांचा कचरा टाकत आहेत. शाळेसारख्या पवित्र जागेचा अवमान होत आहे. ग्रामपंचायतीकडून या प्रकारांवरही लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची स्पष्ट भूमिका…

“कचरा वेचकांनाच कचरा द्यावा. जर कोणी जाणीवपूर्वक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईलच, शिवाय त्याचा फ्लेक्स लावला जाईल आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जाईल.”
— चित्तरंजन गायकवाड, पॅनेल प्रमुख

गावात स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असा पुनरुच्चार करण्यात आला आहे.

Editer Sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??