आरोग्यजिल्हामहाराष्ट्रसामाजिक

हडपसरमधील अण्णासाहेब मगर हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन प्लांट, एक्स-रे मशीन बंद; नागरिकांना आरोग्यसेवेपासून वंचित ठेवणाऱ्या PMC प्रशासनावर संताप…

पुणे (हडपसर) : (ता. १३) पुणे महानगरपालिकेच्या अण्णासाहेब मगर हॉस्पिटलमध्ये आज धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाच्या काळापासून बंद असलेले तब्बल ३६ बेड, ऑक्सिजन प्लांट आणि करोडो रुपयांची एक्स-रे मशीन आजही वापरात नाहीत. हॉस्पिटलच्या भेटीदरम्यान २०२२ आणि २०२३ मधील एक्स-रे रिपोर्ट धुळखात पडलेले आढळले.

हडपसरच्या नागरिकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते, ज्यासाठी मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागतो. अनेकांना कर्ज काढून, व्याजाने पैसे घेऊन उपचार करावे लागतात. गेल्या पाच वर्षांपासून येथे स्वस्तात एक्स-रे सुविधा मिळावी अशी मागणी होत असतानाही PMC च्या आरोग्य विभागाकडून, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडून आणि आरोग्य प्रमुखांकडून सपशेल दुर्लक्ष झालेले आहे.

कोरोना काळातील हडपसरचा सर्वाधिक फटका पुणे शहरात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे आणि हडपसर हा सर्वाधिक प्रभावित भाग होता. त्या वेळी ना बेड उपलब्ध होते, ना ऑक्सिजन. PMC च्या निष्क्रियतेमुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागण्या…

नगर नागरिक कृती समिती, लोकसेवक, जनसेवक आणि इतर संघटनांनी वारंवार खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदारांकडे दोन एकर क्षेत्रात अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याची लेखी मागणी केली होती. मात्र PMC ने केवळ “निधी नाही” असे उत्तर दिले, ज्यामुळे आज या उत्तरावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

आरोग्य प्रमुखांची पत्रकारांना धमकीसदृश भूमिका स्थळावरील आरोग्य केंद्र प्रमुख डॉ. ससाने यांनी पत्रकारांना “चित्रीकरण आणि फोटो काढण्यास परवानगी घेतली का? काढलेले फोटो-व्हिडिओ ताबडतोब डिलीट करा. रोज त्रास देऊ नका. आमच्याकडे वेळ नाही” असा इशारा दिला.

PMC अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आणि इशारा…

आरोग्य केंद्र उपयुक्त डॉ. मीना बोराडे यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई व एक्स-रे मशीन आणि बेड सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र, नगर नागरिक कृती समितीचे मयूर फडतरे, हिरालाल अग्रवाल, उत्तम खंडागळे आणि दिलीप गायकवाड यांनी एक सप्टेंबरपर्यंत सुविधा सुरू न केल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

Editer Sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??