सुभाजी सुभाषचंद्र बोस थोर देशभक्त : प्राचार्य दत्तात्रय जाधव..

पुणे (हडपसर) : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लक्षावधी क्रांतीकारक, हजारो देशभक्त व सामान्य लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. “तुम मुझे खून दो,मैं तुम्हें आझादी दुंगा “असा नारा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन देशासाठी कार्य करावे असे प्रतिपादन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त, पराक्रम दिन आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्तिक थोरात या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले. चित्रा हेंद्रे यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याविषयी गीत सादर केले. क्षतर कविता सुर्यवंशी यांनी शिक्षक मनोगतात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेतला. धनश्री पाटील यांनी १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना काॅपीमुक्त अभियानांतर्गत , ताणतणावमुक्त परीक्षा व उत्तरपत्रिका कशी सोडवावी याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, माधुरी राऊत, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे, गजेंद्र शिंदे, सांस्कृतिक विभागप्रमुख सविता पाषाणकर सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीला गंधट यानी केले. सूत्रसंचालन प्रतिभा हिले यांनी केले. तर स्मिता पाटील आभार यांनी मानले.



