
तुळशीराम घुसाळकर
पुणे (हवेली) : हवेली तालुक्यातील श्री क्षेत्र थेऊर येथे वास्तव्यास असलेल्या भिल्ल समाजाला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातीचे दाखले मिळाले आहेत. तब्बल ५० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १०० हून अधिक कुटुंबांना हा मोठा दिलासा मिळाला.
गेल्या अनेक वर्षांपासून मासेमारी व ढोल पथकाचा व्यवसाय करणारा हा समाज दाखल्यांसाठी झगडत होता. अखेर ग्रामपंचायत सदस्य व आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे, माजी सदस्य विनोद माळी यांचे प्रयत्न व आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या सहकार्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला.
हवेली तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात दाखले वाटप झाले. यावेळी नायगाव येथील १०० कुटुंबांनाही दाखले देण्यात आले.
या दाखल्यांमुळे भिल्ल समाजातील पिढीला शिक्षण, रोजगार व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार असून समाजाच्या प्रगतीला गती मिळेल, असा विश्वास आरोग्यदूत काकडे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास महसूल विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Editer sunil thorat






