“अण्णासाहेब मगर महाविद्यालयात दिव्यांगांसाठी भव्य रोजगार मेळावा; पुण्यासह नाशिक, बीड, धाराशिवमधील उमेदवारांची उत्स्फूर्त उपस्थिती!”

पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालयात समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्स व बर्किलेस यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन आमदार महादेव बाबर यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी स्वागत केले.
यावेळी बार्कलेसचे प्रमुख रश्मी अग्रोर, नियती रॉय सिन्हा, समर्थन ट्रस्टचे प्रमुख सतीश सर, प्लेसमेंट सेल समन्वयक डॉ. निता कांबळे उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्यात दिव्यांग व इतर उमेदवारांना ३५० नोकरीची संधी उपलब्ध झाली. रोजगार मेळाव्यात पुणे जिल्ह्यासह नाशिक, आहिल्यानगर, धाराशिव, बीड जिल्ह्यातील उमेदवार या रोजगार मेळाव्यास उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यात बॅकिंग, आयटी, मार्केटिंग, कॉलसेंटर, कुरिअर, फूड डिलिव्हरी अशा विविध क्षेत्रातील ३५ नामांकित कंपनी व अध्यापनांच्या प्रतिनिधींनी ५६७ उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या. १५३ दिव्यांग उमेदवार या रोजगार मेळाव्यास उपस्थित होते.
माजी आमदार महादेव बाबर यांनी विद्यार्थांना मागदर्शन करताना नोकरी व रोजगाराची समाजा मधील सुशिक्षित बेरोजगारांना आवश्यकता असून असे रोजगार मेळाव्या मधून त्यांना ही संधी उपलब्ध होत असते असे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी बार्कलेस ही दिव्यांगासाठी काम करणारी संस्था असून संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारचे रोजगार मेळावे समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेतले जातात. महाविद्यालय कायमच अशा समाजपयोगी कार्यासाठी कटिबद्ध असून भविष्यात ही अश्या प्रकारचे मेळावे आयोजित करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार विषयक मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतील. असे प्रतिपादन केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, प्रा. आशा माने, प्रा. उर्मिला धनगर, डॉ. शीतल जगताप, प्रा. माहेश्वरी जाधव, प्रा. तेजश्री कोकरे, प्रा .इंगळे, प्रा. महेश शिंदे तसेच करिअर कट्टा स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मनिषा गाडेकर यांनी केले तर आभार डॉ.निता कांबळे यांनी मानले.
Editer sunil thorat








