महाराष्ट्रातील रियल इस्टेट डेव्हलपर्सच्या शिखर संस्थेची अध्यक्षपदी प्रफुल्ल तावरे, तर खजिनदारपदी सुरेंद्र भोईटे!

महाराष्ट्र : क्रेडाई महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील रियल इस्टेट डेव्हलपर्सची शिखर संस्था असून महाराष्ट्रातील एकूण 66 शहरातील संघटना या संस्थेची संलग्न आहेत. ही क्रेडाई संस्था महाराष्ट्र महाराष्ट्रातील ग्राहक, बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी व शासनाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये योगदान देत असते.
या संस्थेच्या अध्यक्षपदाचा मान पहिल्यांदाच बारामतीला मिळाला असून प्रफुल तावरे यांची अध्यक्ष म्हणून तर खजिनदार म्हणून सुरेंद्र भोईटे यांची निवड झाली आहे. या निमित्ताने खजिनदारपद आणि अध्यक्षपदी एकाच वेळी बारामतीला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सन २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल तावरे यांची व खजिनदार म्हणून सुरेंद्र भोईटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड बारामतीसाठी व बारामतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे यामुळे क्रेडाई बारामतीला महाराष्ट्रात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
क्रेडाई महाराष्ट्र महारेरा या नियमक मंडळाची एस आर ओ म्हणून काम करीत आहे. महाराष्ट्रातील डेव्हलपर्सना रेरा रजिस्ट्रेशन व इतर संलग्न विषयांवर मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे तसेच क्रेडाई महाराष्ट्र जीएसटी, महसूल, नगर विकास अशा अनेक विषयांवर डेव्हलपर्सना मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे. विशेष म्हणजे क्रीडायचे आतापर्यंतचे अध्यक्षपद विचारात घेता जिल्हा आणि मोठ्या शहरातील बांधकाम व्यवसायिकांनाच मान मिळाला आहे, आजपर्यंत तालुका स्तरावर प्रथमच क्रेडाई महाराष्ट्र अध्यक्षपद भूषणविण्याची संधी मिळाली आहे.



