जिल्हासामाजिक

पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळाचे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्याखाली महिला पोलीस अंमलदार यांच्या हस्ते उद्घाटन…

पुणे : ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त, पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्याखाली महिला पोलीस अंमलदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या संकेतस्थळामुळे सामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाशी संबंधित माहिती प्राप्त करणे अधिक सोयीचे होईल. संकेतस्थळ हे मोबाईल, टॅबलेट, आयपॅड यासारख्या उपकरणांवर सहजपणे कार्य करते आणि ते नियमितपणे अद्ययावत केले जाते.

संकेतस्थळावर नागरिकांसाठी महत्वाचे दुवे आणि विषयांकरीता स्वतंत्र टॅब उपलब्ध आहेत, जेणेकरून वापरकर्त्यांना आवश्यक माहिती मिळवणे सहज होईल. त्याचप्रमाणे, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि इतर शाखांचा अद्ययावत संपर्क क्रमांक देखील संकेतस्थळावर दिला आहे.

यामुळे पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस प्रशासनाशी संबंधित माहिती सहजपणे मिळवता येईल आणि त्यांचा अनुभव अधिक सुलभ होईल.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??