नगरपालिका निवडणुकीचा निकाल पुन्हा लांबणीवर; उद्याची मतमोजणी रद्द – हायकोर्टाचा मोठा दणका…

मुंबई : राज्यातील नगरपालिका व नगर परिषद निवडणुकांच्या प्रक्रियेत पुन्हा एकदा अनपेक्षित वळण आले आहे. उद्या होणारी मतमोजणी अचानक स्थगित करण्यात आली असून निकालही जाहीर होणार नाही. हायकोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक प्रक्रियेत हा मोठा बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नियोजित कार्यक्रमानुसार 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र अद्ययावत माहितीनुसार आता निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणूक प्रक्रियेतील नियमबद्धता, प्रलंबित याचिका तसेच न्यायालयीन निर्देश यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे संकेत आहेत. हायकोर्टाकडून मिळालेल्या दणक्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पुढील आदेशापर्यंत मतमोजणी स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
राज्यातील अनेक नगर परिषदांमध्ये निकाल कोणाच्या बाजूने झुकणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच हा अचानक बदल झाल्याने उमेदवार, कार्यकर्ते व नागरिकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या प्रकरणातील अधिकृत तपशील अद्याप येत असून परिस्थिती सतत बदलत आहे. मिळत असलेल्या प्रत्येक अपडेटसह ही बातमी आम्ही सातत्याने अद्ययावत करत आहोत.
Editer sunil thorat



