
हडपसर (पुणे) : 1 डिसेंबर 2025 जे एस पी एम, जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पुणे येथे विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून CPR (Cardio Pulmonary Resuscitation) प्रात्यक्षिक सादर करून नागरिकांमध्ये जीव वाचविण्याच्या या अत्यावश्यक तंत्राविषयी जागरूकता निर्माण केली. आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीत सीपीआरचे महत्त्व जनतेपर्यंत पोहचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. विद्यार्थ्यांनी डमीच्या साहाय्याने चेस्ट कंप्रेशनची योग्य पद्धत, श्वसन सहाय्याची प्रक्रिया तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ कारवाई कशी करावी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले. प्रेक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवत सीपीआरची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली.
अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास तातडीने दिलेले CPR जीव वाचण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढवते हे विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरणातून स्पष्ट केले. नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या जनजागृती उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि अशा प्रशिक्षण कार्यक्रमांची समाजात मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर म्हणाले, “सीपीआरचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीला असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे समाजात आरोग्यविषयक जागरूकता निश्चितच वाढेल.”
या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक माननीय आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनीही केले. हडपसर संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे व डॉ. मारुती काळभांडे यांनी मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. प्रगती लगदिवे यांनी केले. या उपक्रमात प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. रविराज जाधव, प्रा. निकिता कोलते, प्रा. चेतन ममडगे, प्रा. तनुजा काशिद तसेच विवेक थोरात, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, स्वाती माकोणे, रूपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पवार काका, कल्पना सुरवसे, आकांक्षा जाधव यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
Editer sunil thorat



