जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

सोळा मजली इमारती इतका खोल आणि ७०० इमारतींच्या खालून जाणारा ‘ऑरेंज गेट–मरीन ड्राईव्ह’ बोगदा ; मुंबईतील अभियांत्रिकीचा नवा चमत्कार…

मुंबई : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीला शास्त्रीय तोडगा आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जलद, अखंडित संपर्क मिळवून देणारा ‘ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह’ भुयारी मार्ग प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाला आहे. सोळा मजली उंच इमारतीइतक्या म्हणजे ५२ मीटर खोल जमिनीतून आणि ७०० इमारतींच्या अगदी खालून हा ५ किलोमीटर लांबीचा प्रचंड बोगदा तयार केला जाणार आहे. या महाकाय प्रकल्पाचा शुभारंभ बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.

एमएमआरडीएने हा मार्ग असा आखला आहे की जमिनीवरील वाहतूक, परिसरातील नागरिक किंवा व्यवसायांना कोणताही त्रास न होता संपूर्ण काम भूगर्भात होणार आहे. विशेष म्हणजे, मेट्रो-३ च्या मार्गाखाली आणखी खोलवर हा बोगदा खोदला जाणार असल्याने प्रकल्पाची जटिलता प्रचंड वाढली आहे. तरीही अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हे काम सुरक्षितरीत्या पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, “पूर्व मुक्त मार्गाला कोस्टल रोडशी जोडणारा हा बोगदा मुंबईच्या वाहतूक इतिहासातील ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’ ठरेल. दक्षिण मुंबईतील कोंडी संपवण्यासाठी आणि नवी मुंबई विमानतळाकडे जलद पोहोचण्यासाठी हा सर्वोत्तम तोडगा आहे.”

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमीन पटेल, तसेच एमएमआरडीए आणि एमएमओसीएलचे शीर्ष अधिकारी उपस्थित होते.

या बोगद्यातून होणारे फायदे

—पूर्व-पश्चिम उपनगरे व नवी मुंबई यांना थेट, अखंडित जोड
—प्रवासाचा वेळ १५–२० मिनिटांनी कमी
—इंधनाची मोठी बचत
—ध्वनी व वायू प्रदूषणात घट

एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले की, “हा परिसर अतिशय दाटीचा असून हेरिटेज इमारती व हजारो रहिवासी असल्यामुळे बोगदाच एकमेव व्यावहारिक उपाय होता. स्लरी शिल्ड टनेल बोरिंग मशीन वापरून हा देशातील सर्वात गुंतागुंतीचा बोगदा प्रकल्प ठरणार आहे.”

या बोगद्यामुळे पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत सहज पोहोचता येईल. आजवर २०–२५ मिनिटांत पूर्व मुक्त मार्गाने पोहोचल्यानंतर पुढील संपूर्ण प्रवास वाहतूक कोंडीत अडकून जात असे; आता तो प्रश्न कायमचा सुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबईच्या पायाभूत सुविधांना नव्या उंचीवर नेणारा आणि अभियांत्रिकी सामर्थ्याचा नमुना ठरणारा हा शहरी बोगदा पुढील काही वर्षांत वास्तवात उतरण्याची अपेक्षा आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??