जिल्हासामाजिक

प्रकल्पातील बाधित झोपडीधारकांना पर्यायी घरे दिल्याशिवाय हटवू देणार नाही ; भगवानराव वैराट…

येरवडा (पुणे) : मुळा-मुठा नदीपात्रालगतच्या ताडी गुत्ता झोपडपट्टीतील झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या शाखेचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.

ताडी गुत्ता परिसर पावसाळ्यात वारंवार पूरकक्षेत येत असल्याने येथे राहणाऱ्या कुटुंबांना दरवर्षी जीवित आणि मालमत्ता धोक्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात तात्पुरते स्थलांतर आणि त्यानंतर पुन्हा झोपड्यांमध्ये परत अशा चक्रातून झोपडपट्टीतील नागरिकांना जावे लागते.

या पार्श्वभूमीवर बोलताना भगवानराव वैराट म्हणाले, “प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांना पर्यायी घरे मिळाल्याशिवाय आम्ही कोणालाही झोपड्या हटवू देणार नाही.” त्यांनी झोपडपट्टीवासीयांच्या कायमस्वरूपी निवाऱ्यासाठी ठोस भूमिका मांडली.

सामाजिक चळवळीच्या नेत्या प्रा. आसमा शेख यांनीही आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “गोरगरीब झोपडपट्टीवासीयांचे राहणीमान सुधारण्यासाठी पक्की घरे देणे आवश्यक आहे. पुणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली पाहिजेत.”

या कार्यक्रमाला कामगार सुरक्षा दलाचे सरचिटणीस काशिनाथ गायकवाड, राज्य संघटिका सुरेखा भालेराव, दिना शेखर, पुणे शहर अध्यक्ष गणेश लांडगे, गुलशन शेख, आयुब शेख, राजश्री चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??