जगात खळबळ! भारतात उतरण्याच्या आधीच पुतिनचा जगाला मोठा संदेश ; तब्बल 7 मंत्र्यांसह भारतात आगमन – काहीतरी मोठं घडणार?

नवी दिल्ली : जगभराचे लक्ष वेधून घेणाऱ्या एका मोठ्या राजनैतिक घटनाक्रमाला आज सुरुवात होत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय भारतदौऱ्यावर येत असून, त्यांच्या आगमनाच्या आधीच जगात खळबळ उडाली आहे. युक्रेन युद्धानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे, आणि त्यामुळे या भेटीभोवती तणावपूर्ण आंतरराष्ट्रीय वातावरण निर्माण झाले आहे.
अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50% टॅरिफनंतर, भारत-रशिया व्यापार थांबवण्याचा मोठा दबाव टाकला गेला. मात्र भारताने हा दबाव न जुमानता रशियासोबत तेल व्यवहार सुरूच ठेवला. यामुळे अमेरिकेत नाराजी, तर रशियाने भारताच्या पाठीशी उभे राहून जगाला स्पष्ट संदेश दिला — “भारत-रशिया मैत्रीवर कुणाचं छत्र नाही!”
दरम्यान, पुतिन आज संध्याकाळी दिल्लीमध्ये उतरणार असून, त्यांच्या अगोदरच रशियाने जगाला “मोठे निर्णय लवकरच” असा संकेत देत राजनैतिक वर्तुळात खळबळ माजवली आहे. पुतिन एकटे नाहीत — त्यांच्यासोबत तब्बल 7 केंद्रीय मंत्री भारतात दाखल होत आहेत. हीच बाब सध्या सर्वांत चर्चेचा विषय आहे. एका राष्ट्राध्यक्षासोबत एवढ्या मोठ्या मंत्रीमंडळाची भारतात एन्ट्री म्हणजे काहीतरी मोठा व्यवहार, करार किंवा धोरणातील मोठा कलाटणीचा निर्णय? असा प्रश्न तज्ज्ञ उपस्थित करत आहेत.
पुतिन विमानतळावरून थेट सरदार पटेल मार्गावरील हॉटेलमध्ये जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात रात्री विशेष डिनर मीटिंग होणार आहे. सुरक्षा इतकी कडक ठेवली आहे की संपूर्ण मार्ग “नो-मूव्हमेंट झोन” करण्यात आला आहे.
या भेटीत संरक्षण, ऊर्जा, व्यापार, नवीन करार, तसेच अमेरिकेच्या टॅरिफबाबत भारताची भूमिका यावर सविस्तर चर्चा होणार आहे. संरक्षण करार, ऊर्जा करार आणि मोठ्या गुंतवणुकीवरील अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भारत-रशिया संबंध दशकानुदशके मजबूत राहिले आहेत. मात्र अमेरिकेच्या निरीक्षणाखाली दोन्ही देश आता काही निर्णायक पावले उचलणार का? हा सर्वात मोठा प्रश्न.
२३व्या वार्षिक शिखर परिषदेत होणारे निर्णय जगाच्या भू-राजनैतिक समीकरणात मोठे बदल घडवू शकतात, अशी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचीही भाकिते आहेत.
Editer sunil thorat



