सामाजिक

गॅस गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात जखमी विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू ; लोणी काळभोर हादरले…

तुळशीराम घुसाळकर

लोणी काळभोर (ता. हवेली) : नेहरू चौकाजवळील जगताप हाईट्स इमारतीत सोमवार (१ डिसेंबर) रोजी झालेल्या गॅस गळतीमुळे निर्माण झालेल्या भीषण स्फोटात गंभीर भाजलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. करूणा मनोज जगताप (रा. जगताप हाईट्स, लोणी काळभोर) यांचे शनिवारी (६ डिसेंबर) निधन झाले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

करुणा जगताप या पतीदोन मुलांसह पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत होत्या. घटनेच्या दिवशी सकाळी त्यांचे पती कामावर गेले होते, तर मुले शाळेत असल्याने त्या घरी एकट्याच होत्या. घरात दोन गॅस सिलेंडर आणि गॅस गिझर असल्याची माहिती मिळते. सकाळी अचानक गॅस गळती झाल्याने प्रचंड स्फोट झाला. दिवाळीनंतर घरात उरलेले काही फटाकेही यावेळी पेट घेत जोरात वाजले, त्यामुळे घरात अराजक निर्माण झाले.

स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की घरातील दरवाजे, खिडक्या फाटून रस्त्यावर फेकल्या गेल्या. काचांचे तुकडे घरात तसेच समोरच्या रस्त्यावर विखुरले. घरातील बहुतेक साहित्य जळून खाक झाले. या भीषण स्फोटात करुणा जगताप गंभीर भाजल्या.

दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणावर घराची खिडकी कोसळल्याने त्याच्या हाताला गंभीर इजा झाली आणि त्याचे हाड मोडले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दोन्ही जखमींना तातडीने लोणी काळभोरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. करुणा जगताप यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

तथापि, काही दिवसांच्या उपचारानंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सुस्वभावी आणि मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या करुणा जगताप यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या दुर्घटनेची पुढील चौकशी लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??