लग्नाचे आमिष दाखवून लिव्ह-इनमधील तरुणीशी संबंध ; लग्नास नकार देत मारहाण करणारा तरुण अटकेत

तुळशीराम घुसाळकर
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार देत मारहाण करणाऱ्या तरुणाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. २५ वर्षीय पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून श्रीकांत बाळासाहेब शिंदे (वय २५, रा. मातोश्री निवास, शेजवळ पार्क, चंदननगर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना एप्रिल २०२४ ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली. कामाच्या ठिकाणी झालेल्या परिचयातून दोघांमध्ये मैत्री झाली व नंतर चंदननगर परिसरात लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. या काळात आरोपीने तरुणीला लग्नाचे आश्वासन देत लोणीकंदमधील एका लॉजमध्ये अनेकदा शारीरिक संबंध ठेवले.
मात्र, तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता श्रीकांत शिंदे याने लग्न करण्यास नकार दिला. त्यातून झालेल्या वादात त्याने मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. फिर्यादी नोंद होताच लोणीकंद पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
Editer sunil thorat



