जिल्हासामाजिक

पांगारे (पुरंदर)ची रणरागिणी तृप्ती काकडे ; मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्यांचा गावकऱ्यांनी थरारक पाठलाग करत दोन आरोपी पकडले…

संतोष काकडे 

सासवड (पुणे) : पांगारे, ता. पुरंदर येथे घडलेली घटना गावच्या महिलांसाठी आणि युवकांसाठी धाडसाचा आदर्श बनली आहे. पांगारे येथील तृप्ती धनंजय काकडे या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्यासाठी तीन चोरटे अचानक घराजवळ आले. मात्र, भीती न बाळगता तृप्ती काकडे यांनी ठामपणे प्रतिकार केला. 

चोरट्यांनी झटापट करत मंगळसूत्र हिसकावून पळ काढला तरी त्यांनी शांत न बसता ताबडतोब गावचे पोलीस पाटील तानाजी काकडे यांना संपूर्ण माहिती दिली.

याचबरोबर तृप्ती काकडे यांनी गावातील युवकांना संपर्क करून सतर्क केले. काही क्षणांतच गावातील महेश काकडे, प्रतापसिंह काकडे, राजेंद्र दादा काकडे, अवी काकडे, पृथ्वीराज काकडे हे सर्वजण घटनास्थळी धावून आले. सर्वांनी मिळून तीन चोरट्यांचा शर्थीचा पाठलाग सुरू केला.

हा पाठलाग जवळपास काही किलोमीटरपर्यंत सुरू राहिला आणि अखेर खेंगरेवाडी शिवारात गावकऱ्यांच्या टीमने दोन चोरट्यांना पकडण्यात यश मिळवले.

पकडलेल्या चोरट्यांकडून मुद्देमालही हस्तगत करण्यात आला. मात्र, तिसरा चोरटा अंधाराचा फायदा घेत फरार झाला. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

अलीकडेच श्रीनिष्णाई मंदिर परिसरासह पांगारे व परिसरात काही चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा काळात तृप्ती काकडे यांनी दाखवलेले धाडस आणि पोलीस पाटील यांची तत्काळ हालचाल यामुळे मोठा अनर्थ टळला. गावातील महेश, प्रतापसिंह, अविराज, राजसिंह, राजेंद्र दादा तसेच हरगुडे परिसरातील तरुणांनीही या कारवाईत मोलाची मदत केली.

गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि त्वरित केलेल्या हालचालीमुळे चोरट्यांना पकडण्यात यश आल्यानंतर संपूर्ण परिसरातून तृप्ती काकडे आणि सर्व युवकांचे प्रचंड कौतुक होत आहे. या धाडसी आणि शिस्तबद्ध कारवाईने गावकऱ्यांसमोर स्वसंरक्षण आणि सामूहिक जबाबदारीचा एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी साहिल ताकवले, यश ताकवले, सचिन ताकवले. मनोज ताकवले, नामदेव जाधव, अथर्व ताकवले, संतोष ताकवले, रोहिदास ताकवले, ऋषिकेश ताकवले, भूपेंद्र ताकवले, श्रीकांत ताकवले व महिला व हरगुडे ग्रामस्थ उपस्थित होते.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??