
मांजरी बु!! (हडपसर) : मांजरी गावातील साईनाथ कॉलनीमध्ये तब्बल ३० लाख रुपये खर्चाच्या नवीन ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन पुणे जिल्हा BJP चे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या हस्ते पार पडले. पुणे महापालिकेच्या वतीने हा निधी मंजूर करण्यात आला असून, यासाठीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा स्वतः माननीय राहुल शेवाळे यांनी केला होता.
साईनाथ कॉलनीमध्ये पूर्वीची ड्रेनेज लाईन सुमारे २० वर्षांपूर्वी करण्यात आली होती. कालांतराने ही लाईन पूर्णपणे गाळाने भरल्याने पाणी तुंबण्याची समस्या तीव्र झाली होती. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींनंतर मनपाच्या ड्रेनेज विभागाने तात्काळ पाहणी केली आणि परिसरात नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचा निर्णय घेतला.
या कामाचे भूमिपूजन वाढत्या पायाभूत सुविधांच्या गरजेला प्रतिसाद देणारे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. कार्यक्रमास राहुल शेवाळे यांच्यासह आबासाहेब भगत, बाळासाहेब मोरे, प्रमोद कोदरे, बबन जगताप यांच्या उपस्थितीत विधी पार पडला. तसेच पांडुरंग जाधव, दादा भंडारी, बाळासाहेब शिंदे, मंगेश भंडलकर, अविनाश नारायण भंडारी, रतन भंडारी, शामराव शेटे, बापू होले, संतोष शिंदे, बाळासाहेब घुले, दिवेकर, ढवळे यांसह मोठ्या संख्येने महिला व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
नवीन ड्रेनेज लाईनमुळे साईनाथ कॉलनीतील पाणी तुंबण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Editer sunil thorat




