
हडपसर (पुणे) : हडपसर येथील जे.एस.पी.एम. जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी पुणे आरोग्यम् योगाश्रम व हर्बल गार्डनला भेट देऊन आयुर्वेदिक वनस्पती आणि योग या विषयांवरील प्रत्यक्षज्ञान आत्मसात केले. आयुर्वेदातील अनेक दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन आणि त्यांचे औषधी मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने महाविद्यालयातर्फे आयोजित या उपक्रमाचे नेतृत्व प्रा. तनुजा काशिद यांनी केले.
उद्यानातील शतावरी, तुलसी, गुळवेल, वेखंड, चंदन, कोरफड, मेहंदी, पुदिना, वड, सदाफुली, कॉफी, पानफुटी अशा विविध औषधी वनस्पतींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांच्या ओळखीपासून ते औषधी गुणधर्मांपर्यंत सर्व माहिती विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने जाणून घेतली. निसर्गाशी नाते घट्ट ठेवून हा वारसा पुढील पिढीकडे नेण्याचे महत्त्व या भेटीदरम्यान विशेष अधोरेखित करण्यात आले.
यानंतर अनंत झांबरे सरांनी विद्यार्थ्यांना योगाविषयी सखोल आणि सुंदर मार्गदर्शन केले. योगाचे शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक पैलू त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केले. “युज” या संस्कृत धातूपासून उद्भवलेला ‘योग’ हा शब्द शरीर, मन आणि आत्मा यांचे एकत्रीकरण दर्शवतो, याची त्यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी उकल करून दिली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर तसेच जेएसपीएम हडपसर शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. वसंत बुगडे आणि डॉ. मारुती काळबांडे यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. तनुजा काशिद यांनी केले असून प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. रविराज जाधव, प्रा. निकिता कोलते, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. चेतन ममडगे, तसेच विवेक थोरात, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, स्वाती माकोणे, रूपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पवार काका, कल्पना सुरवसे आणि आकांक्षा जाधव यांनी विशेष सहकार्य केले.
Editer sunil thorat





