
अकोला : ग्रामीण भागातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि भविष्यातील पिढीत कला जिवंत राहावी या उद्देशाने अकोल्यात आयोजित कार्यक्रमाला विशेष प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विशेष नवजीवन महिला गृह उद्योग, पुणे यांच्या संचालिका किर्ती बोंगार्डे ह्या उपस्थित राहिल्या. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले. विशेषतः महिलांच्या मोठ्या संख्येतील सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी आपल्या शब्दात बोंगार्डे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, “प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचे उपक्रम होणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण भागात अनेक सुप्त कलागुण लपलेले असतात; त्यांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास भविष्यातील पिढीमध्ये कला आणि संस्कृतीची जाण अधिक दृढ होते. ही कला जिवंत ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.” त्यांच्या या विचारांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अकोला आयडॉल सीझन–4 : तब्बल 442 स्पर्धकांनी नोंदणी केली
अकोल्यातील तरुण कलावंतांसाठी मोठे व्यासपीठ ठरणाऱ्या अकोला आयडॉल सीझन–4 स्पर्धेला यावर्षी विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. एकूण 442 स्पर्धक आपली कला सादर करण्यासाठी सज्ज असून गटानुसार नोंदणी पुढीलप्रमाणे झाली आहे—
A Group – 198 स्पर्धक
B Group – 109 स्पर्धक
C Group – 135 स्पर्धक
या सर्व स्पर्धकांसाठी ऑडिशन दिनांक 07 डिसेंबर 2025 (रविवार) रोजी सकाळी 9 वाजता श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे आयोजित करण्यात आले आहेत.
ऑडिशन दिवशी स्पर्धकांनी पुढील नियमांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे :
1. नोंदणी तपासणी :
स्पर्धकांनी वयोगट / ग्रुपनुसार नोंदणी टेबलवर जाऊन स्क्रीनशॉट दाखवून आपली नोंदणी पूर्ण झाली का याची खात्री करावी.
2. इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करणे अनिवार्य :
काउंटरवर उपलब्ध असलेल्या QR कोडद्वारे अकोला आयडॉल इन्स्टा पेज आणि अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होणे अतिशय आवश्यक आहे. पुढील सर्व सूचना याच माध्यमातून देण्यात येतील.
3. ओळखपत्र आवश्यक :
स्पर्धकांनी आधार कार्ड किंवा समकक्ष ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक.
4. ऑडिशन नंबर मिळवणे :
रजिस्ट्रेशन काउन्टरवरून आपला ऑडिशन नंबर घेणे आवश्यक आहे.
5. वेटिंग रूम व्यवस्था :
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, स्पर्धकांनी आपल्या गटानुसार वेटिंग रूममध्ये बसावे. (फक्त स्पर्धकांना प्रवेश)
6. कराओके ट्रॅकची जबाबदारी स्वतःची :
स्पर्धकांनी आपल्या गीताचा कराओके ट्रॅक स्वतःच्या मोबाईलमध्ये तयार ठेवणे अनिवार्य आहे. यात अडचण आल्यास आयोजक कोणतीही जबाबदारी घेणार नाहीत.
7. गीत सादरीकरणाचे नियम :
स्पर्धेअंतर्गत फक्त एक मुखडा आणि एक अंतरा सादर करावा लागेल.
8. ऑडिशन रूममध्ये प्रवेश :
स्पर्धकांनी दिलेल्या ऑडिशन नंबरनुसारच ऑडिशन रूममध्ये प्रवेश करावा.
9. प्रमाणपत्र प्राप्त करणे :
ऑडिशन झाल्यानंतर स्पर्धकांनी त्वरित आपले सहभाग प्रमाणपत्र घ्यावे.
10. सेमीफायनल यादी जाहीर :
सेमीफायनलसाठी निवड झालेल्या स्पर्धकांची यादी अकोला आयडॉलच्या इन्स्टाग्राम पेजवरच जाहीर केली जाईल.
वैयक्तिक फोन किंवा मेसेजद्वारे कोणालाही कळवले जाणार नाही.
11. ऑनलाईन स्पर्धकांसाठी सूचना :
ऑनलाईन व्हिडिओद्वारे ऑडिशन देणाऱ्यांनी दिलेल्या क्रमांकावर निश्चित तारखेलाच व्हिडिओ पाठवणे आवश्यक आहे. उशीरा पाठवलेले व्हिडिओ स्वीकारले जाणार नाहीत.
12. वेळ लागणार असल्याने सोय करून येणे :
ऑडिशनसाठी वेळ लागू शकतो, त्यामुळे स्पर्धकांनी पाण्याची बाटली व जेवणाची व्यवस्था सोबत ठेवावी.
13. परीक्षकांचा निर्णय अंतिम :
स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय हा अंतिम आणि बंधनकारक असेल.
कलाविकासासाठी अकोल्यात सकारात्मक वातावरण…
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागासह ग्रामीण कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांनी जिल्ह्याची सांस्कृतिक परंपरा अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर अकोला आयडॉलसारख्या व्यासपीठांमुळे नवीन कलावंतांना आपली कला सादर करण्याची उत्तम संधी मिळत आहे. या सर्व उपक्रमांमुळे अकोल्यात कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे.
Editer sunil thorat





