अकोला आयडॉल पर्व 4 चे प्रथम ग्राउंड ऑडिशन उत्साहात पार ; राज्यभरातून ३५० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग…

अकोला : सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात “विचारातून कर्तृत्वाकडे” या प्रेरणादायी सूत्रावर कार्यरत असलेल्या युवा विचारपीठ प्रतिष्ठान आयोजित अकोला आयडॉल पर्व 4 या राज्यस्तरीय महागायन स्पर्धेचा भव्य शुभारंभ झाला असून, पहिला ग्राउंड ऑडिशन उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली ही स्पर्धा नवोदित गायन प्रतिभांसाठी एक हक्काचं व्यासपीठ ठरत आहे. संगीत क्षेत्रातील नामांकित कलावंतांपर्यंत या स्पर्धेची ख्याती पोहोचली असून “अकोला आयडॉल”ने राज्यातील तरुण कलाकारांसाठी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याचेच प्रतिबिंब प्रथम ऑडिशनदरम्यान दिसले.
राज्यातील विविध जिल्ह्यांतून तब्बल ३५० स्पर्धकांनी पहिल्या फेरीसाठी उपस्थिती लावली. प्रभावी आणि दर्जेदार गायन सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांनी १४० स्पर्धकांची पुढील फेरीसाठी निवड केली.
उद्घाटन सोहळ्याला श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य रामेश्वरजी भिसे, कालूराम फूड अँड प्रॉडक्ट्सचे संचालक संजय रूहाटिया, डॉ. संतोषजी हूषे, समाजसेविका कमलजीत कौर, निलेशबापू देशमुख, डॉ. प्रवीण अग्रवाल, मनोज भालेराव, डॉ. हर्षवर्धन मानकर, डॉ. संजय तिडके, रुंदा काटकर, प्रा. श्याम कोल्हाले, प्रा. योगेश मल्लेकर, प्रा. जितेश राप्त्रीवार, प्रा. गोपाल राऊत, प्रा. सदानंद मुरूमकर, प्रा. अनिरुद्ध दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या प्रथम ग्राउंड ऑडिशनचे सुयोजित नियोजन युवा विचारपीठ अध्यक्ष व मुख्य आयोजक प्रा. निलेश ढाकरे, उपाध्यक्ष व संयोजिका स्मिता अग्रवाल, मुख्य समन्वयक राजेश अग्रवाल, कार्यकारी समन्वयक कौशिक पाठक आणि समन्वयक मंडळातील गिरीधर भोंडे, डॉ. नितीन देशमुख, अॅड. शेषराव गव्हाळे, प्रा. गणेश पोटे, प्रा. कोमल चिमणकर, अश्विनी ढोरे, डॉ. तृप्ती भाटिया, मेघा देशपांडे, काजल वासरानी, पल्लवी पाठक, रीमा ढाकरे, सुरभी दोडके यांनी अतिशय बारकाईने केले.
त्यांच्या अथक परिश्रमांमुळे संपूर्ण कार्यक्रम भव्य, नियोजनबद्ध आणि उत्कटतेने पार पडला. आयोजकांनी सांगितले की, मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आगामी फेऱ्या अधिक रोमांचक आणि सर्जनशील होणार आहेत.
Editer sunil thorat




