जिल्हामहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया सदस्यपदी विजय पाटील यांची पुनर्नियुक्ती ; एनपीडब्लूएतर्फे भव्य सन्मान आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा…

पुणे : नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन (एनपीडब्लूए) पुणे यांच्या वतीने जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे आणि विशेष सन्मान समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी विजय पाटील यांची नुकतीच झालेली पुनर्नियुक्ती ही या कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरणार आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून एनपीडब्लूएतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

हा विशेष सोहळा शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.३० वा., हडपसर येथील जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या जयवंत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जेएसपीएम विद्यापीठाच्या फार्मसी विभागाचे संचालक डॉ. महेश बुरांडे आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य विजय पाटील या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या निमित्ताने एनपीडब्लूए पुणे यांनी घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धांना फार्मसी विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. विविध श्रेणींमध्ये पार पडलेल्या या स्पर्धांतील विजेत्यांना याच सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार असून, विद्यार्थी व महाविद्यालयांमधील गुणवत्ता, नवोपक्रम आणि व्यावसायिक उत्कृष्टतेला वाव देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या सोहळ्याच्या आणखी एका महत्वाच्या घटनेत “एनपीडब्लूए इनस्पायर २०२५” या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. फार्मसी क्षेत्रातील उदयोन्मुख प्रवाह, संशोधनात्मक लेख, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, तसेच फार्मासिस्टांच्या सामाजिक भूमिकेचा आढावा या नियतकालिकातून साकारला जाणार आहे.

राज्यातील विविध फार्मसी महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षकवर्ग, संशोधक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, फार्मसी क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणणारा आणि प्रेरणादायी संवाद वाढवणारा हा सोहळा ठरणार असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी सांगितले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??