
पुणे : (दि. १९) जिल्ह्यातील ज्या नगरपरिषदांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे, त्या नगरपरिषदांच्या हद्दीत शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार बारामती, दौंड, फुरसुंगी–उरुळी देवाची, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे या नगरपरिषदांच्या मतदारसंघात ही सुट्टी लागू राहणार आहे. संबंधित सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे व सार्वजनिक उपक्रमांनी ही बाब त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालयांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, या मतदारसंघातील मतदार जे कामानिमित्त मतदारसंघाच्या बाहेर कार्यरत आहेत, त्यांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही ही सुट्टी लागू असेल.
दि. २० डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी नचुकता मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
Editer sunil thorat



