मुंबईत रोहित पवार, नगरला लंके, नाशिकला भुसारा; कोणत्या महापालिकांची जबाबदारी कुणावर? राष्ट्रवादीकडून प्रभारींची घोषणा…
शरद पवार यांच्या पक्षाच्या शिलेदाराची नेमणूक, निवडणूक लढण्यासाठी ताकदीने मैदानात...

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठे पाऊल टाकत राज्यातील प्रमुख महापालिकांसाठी निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अनेक अनुभवी आणि प्रभावी नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकांपूर्वी स्थानिक पातळीवरील युती-आघाडीच्या शक्यता, राजकीय समीकरणे आणि पक्षाची ताकद याचा सखोल आढावा घेण्यात आला. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षकांनी आपले अहवाल पक्ष नेतृत्वाकडे सादर केले होते. या अहवालांच्या आधारेच, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन विभागनिहाय आणि महापालिकानिहाय प्रभारी नेमण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बहुतांश नेत्यांकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील किंवा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांतील महापालिकांची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे महापालिकेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून, दोन्ही राष्ट्रवादी गटांमधील समन्वय आणि संभाव्य आघाडीची चाचपणी करण्याची महत्त्वाची भूमिका त्यांच्याकडे असेल. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी जयंत पाटील यांच्यावर नियोजनाची धुरा देण्यात आली आहे. नवी मुंबई आणि पनवेलमध्ये भाजपकडून सत्ता हिसकावून घेण्याच्या दृष्टीने रणनीती आखण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.
कोणत्या नेत्यावर कोणत्या महापालिकेची जबाबदारी?
कोकण विभाग
बृहन्मुंबई : रोहितदादा पवार
ठाणे : डॉ. जितेंद्र आव्हाड
नवी मुंबई : शशिकांत शिंदे
पनवेल : शशिकांत शिंदे
उल्हासनगर : डॉ. जितेंद्र आव्हाड
कल्याण-डोंबिवली : बाळ्यामामा म्हात्रे
भिवंडी-निजामपूर : बाळ्यामामा म्हात्रे
मीरा-भाईंदर : डॉ. जितेंद्र आव्हाड
वसई-विरार : सुनील भुसारा
नाशिक विभाग
नाशिक : सुनील भुसारा
अहिल्यानगर : निलेश लंके
जळगाव : संतोष दौधरी
धुळे : प्राजक्त तनपुरे
मालेगाव : भास्कर भगरे
पुणे विभाग
पुणे : सुप्रियाताई सुळे (राष्ट्रीय कार्याध्यक्षा)
पिंपरी-चिंचवड : डॉ. अमोल कोल्हे, रोहितदादा पवार
सोलापूर : धैर्यशील पाटील
कोल्हापूर : हर्षवर्धन पाटील
सांगली-मिरज-कुपवाड : जयंत पाटील
इचलकरंजी : बाळासाहेब पाटील
मराठवाडा विभाग
छत्रपती संभाजीनगर : बजरंग सोनवणे
नांदेड-वाघाळा : जयप्रकाश दांडेगावकर
परभणी : फौजिया खान
जालना : राजेश टोपे
लातूर : विनायक पाटील
विदर्भ – अमरावती विभाग
अमरावती : रमेश बंग
अकोला : राजेंद्र शिंगणे
नागपूर विभाग
नागपूर : अनिल देशमुख
चंद्रपूर : अमर काळे
या नियुक्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकांसाठी संघटन बांधणी, रणनीती आखणी आणि युती-आघाडीच्या राजकारणाला गती दिल्याचे चित्र आहे. आगामी काळात या प्रभारींच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर हालचाली वाढण्याची आणि निवडणुकीची रंगत चढण्याची शक्यता आहे.
Editer sunil thorat



