
डॉ गजानन टिंगरे
लासुर्णे (ता. इंदापूर) : मौजे लासुर्णे येथील वैदूवाडी परिसरात नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून अंतर्गत काँक्रीट रस्त्यांची मागणी होत होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करत ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे यांनी मागील दोन वर्षांच्या कालावधीत प्रत्येकी १० लाख रुपये निधीचे तीन काँक्रीट रस्ते मंजूर करून त्यांची कामे यशस्वीरीत्या पूर्ण करून घेतली आहेत.
या रस्त्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोलाचे सहकार्य केले. पूर्ण झालेल्या रस्त्यांचे उद्घाटन मंगळवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी स्थानिक नागरिकांच्या आग्रहाखातर पार पडले.
वैदूवाडी येथे यात्रा असल्याच्या पार्श्वभूमीवर गजानन वाकसे यांच्या पुढाकाराने पंचायत समिती इंदापूर यांच्या सहकार्याने नागरिकांसाठी “आयुष्यमान भारत” आरोग्य कार्ड काढण्याचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात अनेक नागरिकांची नोंदणी करण्यात आली असून, वयस्कर नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.
या कार्यक्रमास वस्ताद चंद्रकांत घोरपडे, वस्ताद हणूमंत निंबाळकर, पांडुरंग सुळ, शेखलाल घोरपडे, तुकाराम वाडकर यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
नागरिकांनी रस्ते व आरोग्य सुविधांसाठी केलेल्या कार्याबद्दल गजानन वाकसे व सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.
Editer sunil thorat





