
पुणे : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे महानगरचे अध्यक्ष विलास लेले, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ॲड. तुषार झेंडे, सदस्या ॲड. अनिता गवळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर म्हणाले की, ग्राहकांची फसवणूक रोखणे, त्यांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे तसेच फसवणूक झाल्यास उपलब्ध तक्रार निवारण यंत्रणेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे महानगरचे अध्यक्ष विलास लेले म्हणाले की, ग्राहकांचे हक्क व हित अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सजग राहणे आवश्यक आहे. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे असून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीमार्फत नागरिकांना मोफत सल्ला व मार्गदर्शन दिले जाते, असे त्यांनी स्पष्टअध्यक्ष जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ॲड. तुषार झेंडे यांनी यावर्षीच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाची संकल्पना ‘जलद, सुलभ डिजिटल न्यायाकडे वाटचाल’ अशी असल्याचे सांगितले. ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ हा नागरिकाभिमुख कायदा असून त्याबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे.
नागरिकांची फसवणूक झाल्यास 1915 या हेल्पलाईन क्रमांकावर, 8800001995 या चॅटबॉटवर किंवा e-jagriti.gov.in या संकेतस्थळावर तक्रार दाखल करता येते. अधिकाधिक नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विविध विभागांनी उभारलेल्या माहिती व सेवा स्टॉल्सना भेट देऊन नागरिकांना उपलब्ध सेवा व वस्तुंबाबत माहिती घेतली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये ग्राहक हक्कांबाबत जागरूकता वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले.
Editer sunil thorat





