
हडपसर (पुणे) : दि. १२ जानेवारी २०२६
रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्तही प्रतिमा पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भूगोल विभागप्रमुख व उपप्राचार्य डॉ. संजय जगताप उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवक विद्यार्थ्यांना “युवा आणि समाजपरिवर्तन” या विषयावर मार्गदर्शन केले. युवकांनी समाजबांधणी व राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एकनाथ मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात इतिहास विभागप्रमुख व उपप्राचार्य प्रा. डॉ. दिनकर मुरकुटे यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी असून त्यातून आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम व सेवाभाव निर्माण होतो, असे मत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना समितीचे सदस्य डॉ. राजकुमार हंगारगे, डॉ. अतुल चौरे, डॉ. छाया सकटे, ग्रंथपाल शोभा कोरडे तसेच मोठ्या संख्येने NSS स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांची ओळख व सूत्रसंचालन डॉ. ज्योती किरवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. छाया सकटे यांनी मानले.
Editer sunil thorat





