जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर… वाचा सविस्तर…

2.09 कोटी मतदारांचा सहभाग; 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला मतमोजणी...

मुंबई : माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, अशा ठिकाणी निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगामार्फत आज पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा करण्यात आली. या अंतर्गत राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांत होणार निवडणुका?

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,
छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत.

मतदानाची पद्धत…

या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागणार आहेत. एक मत जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी तर दुसरे मत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी असेल. मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) वापरण्यात येणार आहे.

नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाइन…

राजकीय पक्ष व उमेदवारांच्या मागणीनुसार नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका निवडणुकांप्रमाणेच ही प्रक्रिया जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी लागू असेल.

राखीव जागांसाठी जात वैधता अनिवार्य…

राखीव जागांसाठी उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र नामनिर्देशन पत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, संबंधित जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत सादर करता येईल. मात्र, निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होणार आहे.

मतदान केंद्रांची माहिती…

या निवडणुकीसाठी एकूण 25,482 मतदान केंद्रे असणार आहेत.
कंट्रोल युनिट : 51,537
बॅलेट युनिट : 1,10,329
सर्व मतदान केंद्रांवर वीज, पिण्याचे पाणी, सावली व शौचालय अशा किमान आवश्यक सुविधा (AMF) उपलब्ध असतील. काही मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्र तर महिला मतदारांची संख्या अधिक असलेल्या ठिकाणी पिंक मतदान केंद्र असतील. पिंक मतदान केंद्रांवर सर्व अधिकारी व सुरक्षा कर्मचारी महिला असतील.

मतदार यादी…

या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.
अंतिम मतदार यादी : 3 नोव्हेंबर 2025
मतदान केंद्रनिहाय यादी : 27 नोव्हेंबर 2025
ही यादी भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याने त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नाही. दुबार मतदारांबाबत आवश्यक ती कार्यवाही रिटर्निंग ऑफिसर व जिल्हाधिकारी करणार आहेत.

‘मताधिकार’ मोबाईल ॲप…

मतदारांना आपला प्रभाग, पंचायत समिती गण व मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून ते अँड्रॉइड प्रणालीवर उपलब्ध आहे. तसेच आयोगाच्या पोर्टलवरील votersearch.mahaelection.gov.in या संकेतस्थळावरूनही माहिती मिळू शकते.

विशेष मतदारांसाठी सुविधा…

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला व बाळंतिणींना मतदानासाठी प्राधान्य सुविधा व स्वतंत्र रांग उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

निवडणूक यंत्रणा…

निवडणूक निर्णय अधिकारी : 125
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी : 125
एकूण अधिकारी व कर्मचारी : 1.28 लाख

प्रचार व माध्यमांवरील निर्बंध…

मतदानाच्या 24 तास आधी प्रचार बंदी लागू होईल. या कालावधीत मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावर कोणतीही प्रचार जाहिरात करता येणार नाही.
जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यस्तरावर राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणन व नियंत्रण समित्या कार्यरत राहतील. पेड न्यूज संदर्भातील तक्रारींची चौकशीही या समित्या करणार आहेत.

निवडणूक खर्च मर्यादा…

71 ते 75 विभाग असलेल्या जिल्हा परिषद :
जिल्हा परिषद : 9 लाख
पंचायत समिती : 6 लाख
61 ते 70 विभाग :
जिल्हा परिषद : 7.5 लाख
पंचायत समिती : 5.25 लाख
50 ते 60 विभाग :
जिल्हा परिषद : 6 लाख
पंचायत समिती : 4.5 लाख

मतदार व जागांची माहिती…

एकूण मतदार : 2.09 कोटी
पुरुष : 1.07 कोटी
महिला : 1.02 कोटी
इतर : 473

12 जिल्हा परिषदांमध्ये…

एकूण सदस्य : 731
महिला : 369
अनुसूचित जाती : 83
अनुसूचित जमाती : 25
नागरिकांचा मागास प्रवर्ग : 191

125 पंचायत समित्यांमध्ये…

एकूण सदस्य : 1,465
महिला : 731
अनुसूचित जाती : 166
अनुसूचित जमाती : 38
नागरिकांचा मागास प्रवर्ग : 342

निवडणूक कार्यक्रम…

निवडणूक अधिसूचना : 16 जानेवारी 2026
नामनिर्देशन : 16 ते 21 जानेवारी 2026
छाननी : 22 जानेवारी 2026
माघार घेण्याची अंतिम मुदत : 27 जानेवारी 2026 (दुपारी 3 वाजेपर्यंत)
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : 27 जानेवारी 2026 (दुपारी 3.30 नंतर)
मतदान : 5 फेब्रुवारी 2026, सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30
मतमोजणी : 7 फेब्रुवारी 2026, सकाळी 10 वाजल्यापासून पुढे…

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??