
हडपसर (पुणे) : जागतिक स्तरावरील स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानावर न थांबता प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) नॉलेजवर भर देणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी केले.
Jayawant Shikshan Prasarak Mandal (JSPM) संचलित Jayawantrao Sawant Diploma Pharmacy Institute – इंडस्ट्री इंटरॅक्शन (III) सेलतर्फे प्रथम वर्ष डिप्लोमा फार्मसी विद्यार्थ्यांचा औद्योगिक अभ्यास दौरा दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी NuLife Pharmaceuticals Pvt. Ltd., पुणे येथे आयोजित करण्यात आला. या अभ्यास दौर्यात प्रथम वर्षातील एकूण ६२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या भेटीदरम्यान कंपनीतील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी औषधनिर्मितीतील आधुनिक तंत्रज्ञान प्रक्रिया, उत्पादन व्यवस्थापन प्रणाली तसेच औषधांच्या गुणवत्ता नियंत्रण (Quality Control) आणि गुणवत्ता हमी (Quality Assurance) संदर्भातील सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून औषध उद्योगातील अद्ययावत घडामोडी जाणून घेतल्या. विशेषतः गुणवत्ता तपासणी प्रक्रिया, नियामक मार्गदर्शक तत्त्वे आणि उत्पादनातील सुरक्षितता मानके याविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित ज्ञान मिळाले.
सदर अभ्यास दौरा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जेएसपीएम हडपसर शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. वसंत बुगडे आणि डॉ. मारुती काळबांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा. चेतन मामडगे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. निकिता कोलते, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. रविराज जाधव, प्रा. तनुजा काशीद तसेच स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, विवेक थोरात, स्वाती माकोने, रुपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पांडुरंग पवार, आकांक्षा जाधव आणि कमल बनसोडे यांनी सहकार्य केले.
या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना औषधनिर्मिती क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळाली असून, त्यांच्या व्यावसायिक कौशल्यवृद्धीस मोठी चालना मिळाल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
Edited sunil thorat





