क्राईम न्युज

३.५ किलो सोने, २ किलो चांदी, १ कोटी रोकड आणि २५ बँक अकाऊंटचे कागदपत्रे जप्त, लाच प्रकरणी आयआरएस अधिकारी जाळ्यात…

संपादक सुनिल थोरात

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणेने शनिवारी ३१ मे रोजी २००७ च्या बॅचमधील ज्येष्ठ आयआरएस अधिकारी अमित कुमार सिंगल आणि हर्ष कोटक यांना लाच घेतल्याच्या आरोपात अटक केले होते. तक्रारीनुसार, आयआरएस अधिकारी सिंगल यांनी ४५ लाखांची लाच मागितली होती.

त्याबदल्यात इन्कम टॅक्स विभागातून संबंधिताला दिलासा देण्याचं आश्वासन दिले होते. मात्र लाचेची रक्कम न दिल्यास कायदेशीर कारवाई करू, दंड आकारू अशी धमकी अधिकाऱ्यांनी दिली होती.

शनिवारी सीबीआयने या प्रकरणी २५ लाखांची लाच घेताना अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले. ही रक्कम ४५ लाखांच्या रक्कमेची पहिली खेप होती. सीबीआयने आयआरएस अधिकारी सिंगल यांना दिल्लीतील वसंत कुंज इथल्या निवासस्थानातून अटक केली. सीबीआय या घटनेबाबत पुढील तपास करत आहे. त्यात दिल्ली, पंजाब आणि मुंबईतील अनेक ठिकाणी सीबीआयने धाडी टाकल्या.

या छापेमारीत सीबीआयला ३.५ किलो सोने, २ किलो चांदी, १ कोटी रोकड आणि २५ बँक अकाऊंटचे कागदपत्रे जप्त केली. दिल्ली, मुंबई आणि पंजाब येथील मालमत्तेची कागदपत्रेही आढळली आहे. सध्या सीबीआय या सर्व संपत्तीची मोजणी आणि त्याचा सोर्स याचा तपास घेत आहे. रविवारी या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अटक केलेले आयआरएस अधिकारी अमित कुमार सिंगल सध्या दिल्लीतील आयटीओ येथील सीआर बिल्डिंगमध्ये करदाता सेवा संचालनालयात अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होते.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??