कवडी पाठ माळवाडीतील शिवजयंतीत शिवतांडव नृत्य ठरले प्रमुख आकर्षण ; मान्यवरांची उपस्थिती…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कवडी पाठ माळवाडी येथे “एक गाव – एक शिवजयंती” उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सादर करण्यात आलेले भव्य शिवतांडव नृत्य हे संपूर्ण मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले.
सायंकाळी ८ ते ११ या वेळेत पार पडलेल्या मिरवणुकीस हडपसर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक करणकोट तसेच लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.
या सोहळ्यास ऍड. राहुल झेंडे, विशाल गुजर, सुशिल महाराज काळभोर, रोहित काळभोर, राकेश लोंढे, शंकर देडे, ऍड बाळासाहेब दाभाडे, नितीन टिळेकर, रोहित चांदणे, अजिंक्य काळभोर, राजू कदम, अतुल कदम, प्रसाद कदम, सनी कदम, प्रज्वल गुजर, सौरभ गुजर, राज गुजर, अंकित गुजर, सतीश झेंडे, सागर कदम, इंद्रजीत काळभोर, हेमंत झेंडे, शुभम झेंडे, भैय्या पासलकर, लकी घाडगे, विक्रांत उर्फ पिंटू कदम याच्यासह कवडी पाठ माळवाडी परिसरातील शिवप्रेमी व महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.
ढोल-ताशांच्या गजरात, आणि भगव्या पताकांनी सजलेल्या वातावरणात सादर झालेले शिवतांडव नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या नृत्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या विचारांची प्रभावी मांडणी करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
Editer sunil thorat




