जिल्हामहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

JSPM Jayawant Institute of Pharmacy येथे Medicine Distributor Visit चे आयोजन…

हडपसर (पुणे) : JSPM Jayawant Institute of Pharmacy येथे डी. फार्मसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी Medicine Distributor Visit चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना औषध वितरण प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळावी या उद्देशाने ही शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली.

सदर भेट Bhansali Medisales, हडपसर येथे पार पडली. या वेळी ऋतुजा भंसाली यांनी औषध वितरणाची संपूर्ण पद्धत, स्टॉक व्यवस्थापन, बिलिंग प्रणाली, साठवणूक नियम तसेच औषध वितरणातील कायदेशीर बाबी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी व्यवहार्य अनुभव शेअर केला.

विद्यार्थ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन मिळावे तसेच औषध वितरण क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाज जवळून समजावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राची वास्तव माहिती मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला. कार्यक्रमप्रसंगी जे. एस. पी. एम. शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. वसंत बुगडे व डॉ. मारुती काळबांडे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. निकिता कोलते यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. रविराज जाधव, प्रा. चेतन मामडगे, प्रा. तनुजा काशीद, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, विवेक थोरात, स्वाती माकोने, रुपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, ऋतुजा दाते, पांडुरंग पवार, आकांक्षा जाधवकमल बनसोडे यांनी सहकार्य केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना औषध वितरण क्षेत्रातील व्यावसायिक प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता आली असून भविष्यातील करिअरसाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??