क्राईम न्युज

आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर..; निमगाव केतकी येथे चाकूने सपासप वार करून महिलेचा खून…

डॉ गजानन टिंगरे (प्रतिनिधी) 
पुणे (इंदापूर) : निमगाव केतकी या गावात चाकूने सपासप वार करुन ३३ वर्षीय महिलेचा खून करण्यात आला आहे. सुनिता दादाराम शेंडे असं खून झालेल्या महिलेचे नांव आहे.
           याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर (रा. सुरवड ता. इंदापुर जि. पुणे) याच्या विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी स्वतःहून इंदापूर पोलीस स्टेशनला हजर झाला होता. ही घटना दि.०४ डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी सराफवाडी रोडवरील अजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये घडली आहे.
            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ ते साडे आठ च्या सुमारास ज्ञानेश्वर बबन रासकर यांनी अज्ञात कारणामुळे सुनिता दादाराव शेंडे यांच्या डोक्यात, पोटावर, छातीवर, हातावर चाकूने वार केले. यात सुनिता शेंडे यांचा जागीच मृत्यू झाला. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गावडे करीत आहेत.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??