क्राईम न्युज

नैराश्यातून आपल्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून आत्महत्येचा प्रयत्न ; थेऊर

                                      फोटो – सोशल मीडिया

पुणे ( हवेली) : पुर्व हवेलीत थेऊर ग्रामपंचायत हद्दीत एका आईने आयव्हीएफद्वारे दोन महिन्यांपूर्वी जुळी मुले जन्मताच वारंवार आजारी पडतात या नैराश्यातून आपल्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला.

अशी धक्कादायक घटना घडली असून यामध्ये दोन्ही बाळांचा मृत्यू झाला आहे. सदर घटना थेऊर येथील दत्तनगर परिसरात मंगळवार (८ एप्रिल) रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रतिभा हेमंतकुमार मोहिते, (वय ३६, सध्या रा. दत्तनगर, थेऊर, ता. हवेली मूळ रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली, )असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रतिभा मोहिते हिस ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा मोहिते यांना दोन महिन्यांपूर्वी आयव्हीएफद्वारे जुळी मुले झाली होती. त्या आपल्या मुलांसोबत माहेरी थेऊर येथे आई वडिलांकडे राहण्यासाठी आल्या होत्या. मुले जन्माला आल्यापासून वारंवार आजारी पडत होती. त्यामुळे प्रतिभा मोहिते या तणावाखाली व नैराश्याच्या छायेत असायच्या असे प्रथम दर्शनी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगीतले.

मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रतिभा मोहिते या सकाळी घराच्या टेरेसवर असलेल्या प्लास्टिकच्या एक हजार लिटर पाण्याच्या टाकीजवळ गेल्या व त्यांनी आपल्या दोन्ही जुळ्या मुलांना स्टूलवरती उभे राहून पाण्याच्या टाकीत टाकले. व स्वतः पाण्याच्या टाकीत उडी मारली. टाकीचे तोंड लहान असल्याने व पाणी जास्त असल्याने टाकीच्या आत प्रतिभा मोहिते या पाण्यात बुडाल्या नाहीत. दोन तीन वेळेस टाकीतून डोके वरती आल्याने समोर राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या टेरेसवरून हि घटना पहिली व तात्काळ महिलेच्या घरी येऊन सदरची घटना कळवली. मुलीच्या घरच्यांनी टेरेसवर जाऊन पाहणी केली असता दोन्ही मुले बुडालेल्या अवस्थेत आढळून आली. मुलांना नागरिकांच्या मदतीने वानवडी येथील कमांड हॉस्पिटल येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलिस हवालदार महेश करे, दिगंबर जगताप, विशाल बनकर, पोलिस अंमलदार मंगेश नानापुरे, भारती होले अश्विनी पवार, शिल्पा हरिहर, निकिता पोळ, रुपाली कदम, त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

तसेच मुलांची आई प्रतिभा हेमंतकुमार मोहिते हिला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??