जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

जरांगे म्हणतात ‘विजय’ ; विनोद पाटलांचे ‘निरर्थक निर्णय’ म्हणत सरकारवर टीकास्त्र…

सरकारच्या जीआरवरून मराठा समाजात दोन मतप्रवाह ; ओबीसी संघटना आक्रमक...

पुणे : महाराष्ट्र सरकारने नुकताच मराठा आरक्षणाचा जीआर काढला. या जीआरनंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडले आणि आंदोलकांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. मात्र या निर्णयावरून राज्यातील राजकारणात वादंग पेटले असून ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये मतभेद तीव्र झाले आहेत.

विनोद पाटलांचा सरकारवर निशाणा…

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र टीका केली. “हा निर्णय नसून केवळ माहिती पुस्तिका आहे. याचा मराठा समाजाला कोणताही फायदा होणार नाही,” असा दावा त्यांनी केला. तसेच उपमुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवरही त्यांनी निशाणा साधला. “सरकारनं काढलेल्या जीआरचा नेमका फायदा काय होणार आहे हे विखे पाटलांनी स्पष्ट करावं,” असा टोला त्यांनी लगावला.

मनोज जरांगे पाटलांचे प्रत्युत्तर…

विनोद पाटलांच्या टीकेला मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी “हा जीआर मराठा समाजासाठी महत्त्वाचा टप्पा आहे आणि यामुळे आंदोलन यशस्वी झाले,” असे सांगत उपोषण मागे घेतले.

ओबीसी संघटना आक्रमक…

दुसरीकडे, या जीआरला ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “मनोज जरांगे यांच्या हट्टाखातर सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करत हा जीआर काढला. हा जीआर म्हणजे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं ‘डेथ वॉरंट’ आहे,” असा इशारा ओबीसी चळवळीचे कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी दिला. “हा बेकायदेशीर जीआर कोर्टात आव्हान देऊन रद्द होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असेही ते म्हणाले.

दोन मतप्रवाह…

जीआरवरून मराठा समाजातही मतभेद उघडकीस आले आहेत. जरांगे पाटलांच्या मते हा निर्णय विजय आहे, तर विनोद पाटलांच्या मते तो निरर्थक आहे. त्यामुळे समाजात दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत.

सुप्रिया सुळेंची टीका…

या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली. “केंद्रात आणि राज्यात सरकार तुमचंच आहे. २५० खासदार तुमचे आहेत. तरीही मराठा आरक्षण का मिळत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आम्ही मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहोत, पण राज्य सरकार या विषयात असंवेदनशील आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा करावी आणि सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यात त्यांच्या शिष्टमंडळालाही सहभागी करून घ्यावं,” अशी मागणी सुळेंनी केली.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??