अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) प्रशिक्षण ; बारक्लेज कंपनीच्या सी.एस.आर. फंडातून उपक्रम राबवला…
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा उपक्रम ; अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ए.आय., करिअर प्लॅनिंग, सायबर सेफ्टी व लाइफ स्कील्सवर ११० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण...

पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या व्यवसाय अभ्यासक्रम विभाग आणि जी.टी.टी. फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, बारक्लेज कंपनीच्या सी.एस.आर. फंडातून इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात नवीन तंत्रज्ञान, करिअर प्लॅनिंग, कम्युनिकेशन स्कील्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग व डिसीजन मेकींग, डिजिटल सायबर सेफ्टी, बजेटिंग अशा विविध विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच बारक्लेज कंपनीच्या सी.एस.आर. प्रमुख रेणू मॅडम व जी.टी.टी. फौंडेशनच्या उमा नटराजन यांनी खराडी येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना लाइफ स्कील्स व ए. आय. या विषयांवर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यात निश्चितच मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप यांनी केले.
या प्रसंगी प्रा. डी. बी. देशमुख, प्रा. एस. डी. कामठे, प्रा. एस. ए. तांबोळी, प्रा. एन. एस. म्हेत्रे, प्रा. आर. डी. देशमुख, प्रा. एल. जे. जराड, प्रा. डी. बी. जगताप, प्रा. अरुण मोरे, प्रा. व्ही. जे. कुंडलकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एल. जे. जराड यांनी केले तर आभार प्रा. डी. बी. देशमुख यांनी मानले.
Editer sunil thorat




