क्राईम न्युजजिल्हामहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

MIT Art Design and Technology University चा ‘पर्सोना फेस्ट–२०२६’ आजपासून…

सिने अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, सिनेगीतकार समीर अंजान, गायक अमित मिश्रा, अभिनेत्री प्राची पांडे यांची उपस्थिती...

लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी-काळभोर येथील MIT Art Design and Technology University चा बहुप्रतिक्षित वार्षिक टेक्नो-कल्चरल महोत्सव ‘पर्सोना फेस्ट–२०२६’ आजपासून (१९ फेब्रुवारी) सुरू होत असून, हा महोत्सव १९ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रंगणार आहे. देशभरातील १३० हून अधिक महाविद्यालये व विद्यापीठांमधील सुमारे २० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.

महोत्सवाचे उद्घाटन ‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्री Bhagyashree Patwardhan यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक-निर्माते Samruddhi Porey उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष तथा कुलपती Dr. Vishwanath Karad भूषवतील. कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड आणि कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध क्षेत्रांतील नामवंत कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे. ज्येष्ठ सिनेगीतकार Sameer Anjaan, सुप्रसिद्ध गायक Amit Mishra, अभिनेत्री Prachi Pandey, मराठी अभिनेता Kshitish Date, सेलिब्रिटी आर.जे. संग्राम खोपडे, डान्सर सिद्धेश थोरात तसेच युवा नगरसेविका सिद्धी शिलिमकर यांचा सहभाग असणार आहे.

या टेक्नो-कल्चर महोत्सवात नामांकित गायक व बँड यांचे थेट संगीत सादरीकरण (लाईव्ह कॉन्सर्ट), तंत्रज्ञान, व्यवसाय, कला व संस्कृती विषयक माहितीपर सत्रे, विद्यार्थ्यांच्या नृत्य-नाट्य सादरीकरणांसह कोडिंग व तांत्रिक स्पर्धा, क्रीडा आणि विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी आणि कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ‘पर्सोना फेस्ट–२०२६’मुळे विद्यार्थ्यांच्या कला, तंत्रज्ञान व नेतृत्वगुणांना व्यासपीठ मिळणार असून पुणे परिसरातील हा एक भव्य आणि बहुआयामी महोत्सव ठरणार आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??