संग्रहित फोटो
पुणे : रस्त्यावर गाडी लावून एक नागरिक औषध आणायला जाताे, तेवढ्यात टोईंग वाहतुकीच्या गाडीने ‘नो पार्किंग’मधील गाडी उचलून घेऊन जातात. तेवढ्यात वाहन चालक गाडीजवळ येतो आणि टोईंग कर्मचाऱ्यांशी संवाद सुरू होतो.
वाहन चालक म्हणतो घरात औषध द्यायला गेलो हाेताे. मोजून पाच ते दहा मिनिटाच्या आत आलो आहे. त्यात तुम्ही गाडी उचलली. हॉटेल व्यावसायिक, कुरिअरवाले यांच्या गाड्या असताना तुम्ही उचलत का नाही? असा प्रश्न विचारला जातो. टोईंगला कामाला असणारे कर्मचारी उद्धटपणे बोलत असतात. पावती केली आहे. तुम्हाला पावती द्यावी लागेल, असे सांगितले जाते. चालकाला बाजूला घेऊन काही वेळा तोडपाणी वर पण चर्चा केली जाते. अशा प्रकारे वाहतूक पोलिस ‘नो पार्किंग’ मधील गाड्या उचलून वाहन चालकांची लूटमार करीत आहेत. असे नागरिक चर्चा करत आहेत.
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नो-पार्किंग मधील गाड्यांचा रस्त्यावर अडथळा होत असतो त्या अनुषंगाने वाहतूक पोलीस अशा वाहनांवर टोईंगद्वारे नो-पार्किंगची कारवाई करतात. यामध्ये पुणेकरांना नो पार्किंगचा १४ कोटी ७२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तरीही अनेक रस्त्यावर डबल पार्किंग, नो-पार्किंगमध्ये वाहने लावण्याचे प्रकार सुरूच आहेत.
टोईंग व्हॅनचे भाडेही नागरिकांकडूनच वसूल..
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक नियभंगाची पोलिसांकडून कारवाई केली जाते. रस्त्यावर डबल पार्किंग, नो-पार्किंगमध्ये वाहने लावल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडले. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून ३० टोईंग व्हॅनच्या मदतीने दररोज नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाई केली जाते. यामध्ये चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी १० आणि दुचाकींवर कारवाई करण्यासाठी २० टोईंग व्हॅन आहेत. नो-पार्किंगच्या दंडाबरोबरच या टोईंग व्हॅनचे भाडे देखील नागरिकांकडूनच वसूल केले जाते. असे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
नो-पार्किंगचा दुसऱ्या वेळी दुप्पट दंड..
नो-पार्किंगची एकदा कारवाई केल्यानंतरही एखाद्याने पुन्हा गाडी नो-पार्किंगमध्ये लावल्यास त्याला दुप्पट दंड भरावा लागतो. नो-पार्किंगमध्ये दुचाकी लावल्यानंतर पहिल्यांदा ७८५ रुपये दंड आहे. पण, दुसऱ्या वेळी देखील नो-पार्किंगमध्ये दुचाकी लावल्यास त्याला १७०० रुपये दंड आहे. चारचाकीला पहिल्या वेळी एक हजार ७१ रुपये, तर दुसऱ्यावेळी पकडल्यास दोन हजार ७१ रुपये दंड आहे.
वास्तव काय?
नो पार्किंच्या कारवाईसाठी एकूण वाहने- ३०
असा आहे नो-पार्किंगचा दंड
चारचाकीसाठी- एक हजार ७१
दुचाकीसाठी – ७८५
आनंद खामकर
पुणे स्टेशन शिवसेना शाखाप्रमुख
वाहतुकीस होणारा अडथळा दूर करण्याऐवजी वाहतूक पाेलिस दंड वसुली करण्याचा आणि वाहनचालकांकडून पैसे उकळण्याकडेच कल असतो. बहुतांशी ठिकाणी वाहतूक पोलिस वाहनचालकांना दिसू शकणार नाहीत, अशा जागी थांबतात आणि अचानकपणे गाड्या अडवतात. वाहन टोईंग करताना संबंधित वाहनाचे नुकसान होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी. सर्वसामान्यांना त्रास न देता पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.
राम पाटील संस्थापक अध्यक्ष छावा स्वराज्य सेना
टोईंग कर्मचारी उद्धटपणे बोलत पावती केली आहे. आता काही होऊ शकत नाही तुम्हाला पावती द्यावी लागेल, एवढे पैसे झालेत ७८५ रुपये भरावे लागले. त्यानंतर दोन-तीन पोलिस ये-जा करत होते. त्यांनी त्याला शांत केले व तिथून निघून जाण्यास सांगितले. अशा पद्धतीने वाहन चालकांना त्रास देत आहेत. यावर ठाेस कारवाई वरिष्ठांनी केली पाहिजे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा