क्राईम न्युज

तरुणाचे पुण्यात अपहरण..; फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही पिडित दोघांना फसवणारा तिसराच निघाला..सविस्तर वाचा..

हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांच्या कडे तपास...

पुणे (हडपसर) : तामिळनाडुहून मुंबईला जात असताना पुण्यात तरुणाचे अपहरण करुन त्यांना हॉटेलमध्ये डांबुन ठेवण्यात आले होते. या तरुणाने हुशारीने आपल्या तामिळनाडु येथील नातेवाईकांना याबाबत माहिती कळविले.

       नातेवाईक यांनी पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांना याबाबत माहिती कळविले. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी पथकाने या तरुणांचा शोध घेऊन सोलापूर रोडवरील पिंगारा हॉटेल येथून या तरुणाची सुटका केली. युवकाचे अपहरण करणार्‍या ६ जणांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडे कसुन चौकशी केल्यावर हा तरुण आणि आरोपी हे दोघेही पिडित असून फसवणुकीचे शिकार झाले असल्याचे पोलीसांना दिसून आले.

       मोहम्मद फर्मान मेहेरबान (वय २७, रा. नरुलापूर, बिजनोर, उत्तर प्रदेश), अर्जुन कुमार शिवकुमार (वय २८, रा. नरुलापूर, बिजनोर, उत्तर प्रदेश), देवेंद्र सुनिल अलभर (वय २५, रा. देवपैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), अंकित अर्जुन अडागळे (वय २५, रा. पवई आयआयटी मार्केट, मुंबई), अविनाश दत्तात्रय कदम (वय ४३, रा. शिक्रापूर मलटण फाटा, शिक्रापूर), प्रियांक राणा देवेंद्र राणा (वय ३३, रा. न्यू आदर्शनगर, रुडकी, जि. हरिद्वार, उत्तराखंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

           याबाबत सविस्तर माहिती अशी व्यंकटेश सुब्रम्हण्यम (वय ३५, रा. तिरुवन्नामलाई, तामिळनाडु) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिनांन्स प्रा. लि. कंपनीचे मॅनेजर रमेश यांनी व्यंकटेश सुब्रम्हण्यम यांना नोकरी दिल्याचे सांगितले. दुसरीकडे रमेश यांनी आरोपींना आमच्या कंपनीमध्ये गुंतवणुक करा असे सांगितले. त्यानुसार, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमधील हे आरोपी गुंतवणुक करण्यास तयार झाले. तेव्हा रमेश याने व्यंकटेश यांना तुम्हाला नोकरी देतो, तुमचे पहिले काम या लोकांकडे जाऊन पैसे घ्या आणि ते माझ्या अकाऊंटला ट्रान्सफर करा. व्यंकटेश आणि आरोपी या दोघांनी रमेश याची कधी भेट घेतलेली नाही.

           व्यंकटेश हे मुंबईला गेले. त्यांनी या लोकांकडून पैसे घेतले. ते रमेश यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. ६ जानेवारी हा सर्व व्यवहार झाला. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर रमेश हा मोबाईल बंद करुन पसार झाला. त्यामुळे आरोपींना संशय आला की हाही त्यांना मिळाला आहे. त्यांनी व्यकंटेश याला मुंबईला बोलावले. त्याचे पुण्याजवळ अपहरण करुन त्याला सोलापूर रोडवरील पिंगारा हॉटेलमध्ये घेऊन गेले. हॉटेलमध्ये व्यंकटेश याला मारहाण करुन डांबुन ठेवले. त्याने आपल्या नातेवाईकांना फोन करुन हे कळविले. त्यानंतर ९ जानेवारी रोजी त्यांनी पुणे पोलिसांना याची माहिती दिली. पुणे पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन सुटका केली. ६ जणांना अटक केली.

      हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दरोडा व वाहन चोरी पथकाने सहा जणांना हडपसर पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांच्या ताब्यात पुढील चौकशी साठी ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी व्यंकटेश आणि आरोपी हे दोघेही पिडित असून दोघांना रमेश याने फसविले असल्याचे समोर आले आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करीत आहेत.

         ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, संदिपान पवार, युवराज हांडे, पठाण, सहायक पोलीस निरीक्षक सी बी बेरड, तसेच युनिट ५ व ६ च्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??