महिलांच्या नेतृत्वाखाली ‘संविधान बचाव आंदोलन’ ; सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध…

लोणी काळभोर, (हवेली) : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. बी. आर. गवई यांच्यावर वकील राकेश किशोर तिवारी या व्यक्तीने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज “संविधान बचाव आंदोलन”चे जोरदार आयोजन करण्यात आले. हे आंदोलन लोणी स्टेशन येथून सुरू होऊन लोणी काळभोर पोलीस स्टेशनपर्यंत निघाले.
या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिलांचे नेतृत्व. समाजातील विविध घटकांतील महिला नेत्या अनिता गोरे, कौशल्यताई ईजगज, फातिमाताई पठाण, अंजना देडे, आशा ओव्हाळ, सुनिता शिनगारे आणि ॲड. अनिता गवळी यांनी संविधान आणि न्यायव्यवस्थेच्या सन्मानासाठी बुलंद आवाज उठवला.
आंदोलनात बहुजन कृती समिती चे नेते आणि विविध सामाजिक राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामध्ये श्रीकांत ओव्हाळ (BKS), महेश जैनजागडे (रिपब्लिकन भीम क्रांती सेना), दत्ता कांबळे, गणेश तौर (बहुजन कृती समिती समन्वयक), विनायक अण्णा कांबळे (जेष्ठ नेते), सूर्यकांत गवळी (राष्ट्रवादी श.प गट), दीपक आढाळे (रिपा ई), संजय भालेराव (वंचित बहुजन आघाडी), संजय आवारे (आझाद समाज पार्टी), अमोल लोंढे (परिवर्तन क्रांती सेना), विशाल पेटकर, दिगंबर जोगदंड (मातंग क्रांती सेना), संदीप शेलार (बसपा), मेजर नागसेन ओव्हाळ (समता सैनिक दल), विजय गायकवाड (भारतीय बौद्ध महासभा), ॲड. सुजित कांबळे, सतपाल थोरात, अक्षय म्हस्के, मुकुंद सुर्यवंशी, उत्तम टोम्पे आणि लिंबाजी गायकवाड यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
नेत्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले की —
“हा हल्ला फक्त एका व्यक्तीवर नसून संपूर्ण भारतीय न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर झालेला आहे. अशा मनुवादी प्रवृत्तींना तोंड देण्यासाठी समाज एकजुटीने उभा राहिला पाहिजे.”
आंदोलनानंतर पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यामध्ये तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या—
—आरोपी वकील राकेश किशोर तिवारीवर तात्काळ कठोर कारवाई करावी.
—न्यायाधीशांच्या सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करावी.
—संविधानविरोधी आणि जातीवादी प्रवृत्तींच्या मुळावर शासनाने वार करावा.
हे आंदोलन शांततेत आणि संविधानाच्या चौकटीत पार पडले असून महिलांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या आंदोलनाने “संविधान बचाव”चा आवाज आणखी बुलंद केला आहे.
Editer Sunil thorat





