सुनिल थोरात (हवेली)
पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुणे पुस्तक महोत्सव अंतर्गत “शांतता पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचे उदघाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्तविक केले.
वाचनामुळे माणसाची विचार क्षमता वाढते, कल्पनाशक्ती वाढते, ज्ञानात भर पडते. क्रमिक पुस्तकांशिवाय आवांतर विषयांची पुस्तके वाचल्याने आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवतात. या उपक्रमातुन विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी सातत्याने वाचनात करावे असे आवाहन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख यांनी केले.
प्रास्तविकात महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी “शांतता पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमाबद्दल आणि पुणे पुस्तक महोत्सवा संबंधी माहिती दिली.
या उपक्रमात महाविद्यालयातील विविध विभागाचे दोन हजार तीनशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पुस्तक वाचनाचे अकारा कार्यक्रम झाले. महाविद्यालय ग्राउंड, वाणिज्य सेमिनार हॉल,शिवाजी सभागृह, MBA बिल्डींग वर्ग, सांस्कृतिक हॉल, व्यावसायिक विभाग, अभ्यासिका अशा विविध ठिकाणी वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा.अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, डॉ. लतेश निकम,डॉ. सविता कुलकर्णी, डॉ.दत्तात्रय संकपाळ आदी उपस्थित होते.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा