क्राईम न्युज

ॲट्रॉसिटी, खंडणी आणि विनयभंगाच्या गुन्ह्यातील दोघांना लोणी काळभोर पोलिसांची अटक…

तुळशीराम घुसाळकर 

लोणी काळभोर (ता. हवेली) : खाजगी सावकाराकडून दुकानाच्या नुतनीकरणासाठी घेतलेल्या पाच लाख रुपयांच्या मोबदल्यात तब्बल एकवीस लाख रुपये वसूल करूनही महिलेला जातिवाचक शिवीगाळ व छेडछाड केल्याप्रकरणी दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून फरार होते. पोलिसांनी उरुळी कांचन परिसरातून त्यांना शिताफीने पकडले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ४७ वर्षीय विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुल लक्ष्मण काळभोर (रा. तरवडी, रानमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे) व विशाल विठ्ठल काळभोर (रा. सिद्राममळा, लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटना सन २०२० ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत घडली होती.

५ लाखांच्या बदल्यात २१ लाखांची वसुली…

फिर्यादी महिलेला तिच्या दुकानाचे नुतनीकरण करावयाचे होते. त्यामुळे तिने २०२० मध्ये राहुल काळभोर याच्याकडून पाच लाख आठ हजार रुपये उधारीवर घेतले. त्यावेळी आरोपीने “या रकमेसाठी ४ टक्के व्याज द्यावे लागेल” असे सांगितले होते.

त्यानंतर राहुल काळभोर याने वेळोवेळी पैशांची मागणी करत एकूण २१ लाख रुपये वसूल केले. तरीसुद्धा आरोपीने समाधान न मानता अधिक पैशांची मागणी सुरूच ठेवली. त्यामुळे फिर्यादी महिला आणि तिच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागला.

जातिवाचक शिवीगाळ आणि अश्लील वर्तन

८ ऑगस्ट २०२५ रोजी आरोपी राहुल काळभोर आणि त्याचा साथीदार विशाल काळभोर हे दोघे फिर्यादीच्या दुकानात आले. त्यांनी जातिवाचक शिवीगाळ केली तसेच राहुल काळभोर याने महिलेशी अश्लील बोलून तिच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या घटनेनंतर महिलेनं थेट लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ ॲट्रॉसिटी कायदा, खंडणी आणि विनयभंगाचे कलम लावून गुन्हा नोंदवला.

फरारी आरोपींची अटक…

गुन्हा नोंद झाल्यानंतर दोघे आरोपी फरार झाले होते. पोलिसांचे विशेष पथक त्यांच्या मागावर होते. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे उरुळी कांचन परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला आणि दोघांना मोठ्या शिताफीने जेरबंद केले.

पोलिसांची कामगिरी…

ही कारवाई उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे आणि गुन्हे शाखेच्या निरीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस हवालदार गणेश सातपुते, संतोष राठोड, अण्णा माने, रामहरी वणवे, राहुल कर्डिले, प्रवीण धडस, योगेश पाटील, शैलेश कुदळे, सुरज कुंभार, चक्रधर शिरगिरे, सचिन सोनवणे, आणि बाजीराव वीर यांनी सहभाग घेतला.

परिसरात चर्चेचा विषय…

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, खाजगी सावकारीच्या नावाखाली महिलांना त्रास देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Editer Sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??