देश विदेशमहाराष्ट्र
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे मुंबईत आगमन; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत…

मुंबई : (दि. 8) ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आज मुंबई दौऱ्यावर आले असून, त्यांचे आगमन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाले.
यावेळी महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान स्टार्मर यांचे स्वागत केले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या भारत दौर्यात आर्थिक सहकार्य, गुंतवणूक आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Editer Sunil thorat





