संपादक सुनिल थोरात
पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे आणि क्विक हिल फाउंडेशनचे प्रमुख अजय शिर्के यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
या सामंजस्य करारा अंतर्गत महाविद्यालयातील वीस विद्यार्थी परिसरातील शाळांमध्ये सायबर सुरक्षेसंबंधी संबंधी कार्यक्रम घेणार आहेत तसेच आपल्या महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा या स्वरूपाच्या कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. समाजामधील एनजीओ, कंपन्यांमधील कर्मचारी, महिला बचत गट, इतर औद्योगिक संस्था मधील कर्मचारी इत्यादी समाज घटकातील लोकांमध्ये सायबर सुरक्षेसंबंधी कार्यक्रम महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणार आहे.
या समंज्यस्य करारामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी उपयोग होणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सांगितले.
यावेळी डॉ. प्रशांत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मनीषा गाडेकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा