जिल्हा

अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; अवैध वाहतुकीवर कडक कारवाई… हवेली

"नियमभंग करणाऱ्यांना आता माफ नाही," अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते...

संपादक सुनिल थोरात

पुणे (हवेली) : वाघोली परीसरातील सुरभी चौकात अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या नेतृत्वाखाली अवैध वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली.

अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या नेतृत्वाखाली (दि.२७) कर्मचारी यांच्या समवेत सकाळ पासून कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणार्याचे कंबरडं मोडले. यापुढे ही कारवाई अधिक कडक करणार असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईत या कारवाईत १६ वाहनांची कसून तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी फक्त ७ वाहनचालकांकडे वैध वाहतूक पास आढळले.

या कारवाईदरम्यान एका वाहन चालकाने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याचे फोटो व व्हिडीओचे चित्रीकरण करत गाडी जप्त केली.

अवैध धंदे, अवैध वाहतूक, अवैध उत्खनन, वाळू माफिया यांना या कारवाईमुळे काही काळापुरता तरी चाप बसला यात शंका नाही. “नियमभंग करणाऱ्यांना आता माफ नाही,” असा कडक इशारा अप्पर तहसीलदार कोलते यांनी दिला.

अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते अवैध वाहतूकीवर कारवाई करणार असल्याची माहिती वार्यासारखी पसरली. या कारवाईची माहिती डंपर चालक, आणि मालकांनी समजताच आपली वाहने लपवण्यात आली. काही वाहनाने मार्ग बदलला, काही वाहने अक्षरशा पळ काढला. या परिसरात काही काळ शांतता पसरली होती. प्रशासनाकडून यापुढे अशाच प्रकारे सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी स्पष्ट केले. कोणालाही नियम मोडण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश यावेळी बोलताना दिला.

अवैध वाहतूक, अवैध उत्खनन, अवैध साठा अशा प्रकारची कारवाई पुणे सोलापूर रोड वर होणे अपेक्षित आहे. अशी कारवाई कधी होणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांना सतावत आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??