जिल्हाराजकीयसामाजिक

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर ; कदमवाकवस्ती SC महिलांसाठी राखीव…

कदमवाकवस्ती : अनुसूचित जातीतील महिलेसाठी राखीव ; हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींचं आरक्षण जाहीर...

पुणे (हवेली) : गावगाड्यातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता.११) काढण्यात आली. यामुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे संमिश्र चित्र पाहायला मिळाले. हवेली तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले.

हवेली तालुक्याचे तहसीलदार किरण सुरवसे, यांच्या उपस्थितीत पुढील २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत सरपंच आरक्षण ठरले. आरक्षण सोडत काढताना गावागावांतील अनेक इच्छुक मंडळी उपस्थित होती. यात आरक्षणाचा फटका बसल्यामुळे काही जणांच्या पदरी निराशा आली, तर पूरक आरक्षणामुळे सरपंचपदाची संधी मिळण्याच्या आशेमुळे बरेच इच्छुक आजपासूनच कामाला लागले आहेत. विशेषतः राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यात काहीजणांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. तर काही जणांच्या आशेवर पाणी फेरले गेल्याचे दिसून आले.

सर्वसाधारण गटामध्ये असलेली गावे…

फुलगाव, वडगांव शिंदे, अहिरे, खानापुर, बकोरी, बिवरी, तुळापुर, पिंपरी सांडस, वाडेबोल्हाई, बहुली, मालखेड, डोणजे, गोन्हे खुर्द, सोनापुर, शिरसवडी, बुर्केगाव, पेरणे, लोणीकंद, अष्टापुर, सांगरूण.

सर्वसाधारण महिला गटामध्ये असलेली गावे…

कल्याण, मांजरी खुर्द, घेरासिंहगड, आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोर, तरडे, भवरापूर, उरुळी कांचन, खडकवाडी, आर्वी, गाऊडदरा, श्रीरामनगर, थेऊर, कोलवडी साष्टे, न्हावी सांडस, कुंजीरवाडी, आव्हाळवाडी, सांगवी सांडस, मांडवी बुद्रक व वढू खुर्द.

नागरिकांचा मागास प्रवर्ग गटामध्ये असलेली गावे…

निरगुडी, मांडवी खुर्द, शिंदवणे, सोरतापवाडी, गोहे बुद्रुक, भावडी, डोंगरगाव, खामगाव टेक, गोगलवाडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटामध्ये असलेली गावे…

वळती, वडकी, जांभळी, आंबी, पेठ, मणेरवाडी, शिवापूर, नायगाव, कोंढणपूर, कुडजे.

अनुसूचित जाती गटामध्ये असलेली गावे…

खामगाव मावळ, कोरेगाव मूळ, टिळेकरवाडी, राहाटवडे, केसनंद.

अनुसूचित जाती महिला गटामध्ये असलेली गावे…

आगळंबे, खेड शिवापूर, हिंगणगाव, कदमवाकवस्ती, प्रयागधाम.

अनुसूचित जमाती गटामध्ये असलेली गाव…

वरदाडे

अनुसूचित जमाती महिला गटामध्ये असलेली गाव…

शिंदेवाडी

जनतेतून सरळ सरपंच पदाची निवड असल्याने हवेली तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विविध राजकीय नेते मंडळीची उपस्थिती फारच कमी होती. अंदाजे दोनशेच्या आसपास नागरिक यावेळी उपस्थित होते. जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने निवडणूक लढवायला खुपच खर्च येतो. त्यामुळे इच्छुक आपोआपच कमी होतात अशी चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये सुरु होती. आपापल्या गावातील आरक्षण सोडत समजल्यानंतर मोर्चे बांधण्यासाठी आलेले गावगाड्याचे नेते मंडळी परतली.

मुख्य संपादक श्री सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??