
सोशल मीडिया पोस्ट
नवी दिल्ली : अमेरिकेत २०१९ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारताच्या सुप्रिया जाटवने सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. दलित समाजातून आलेली सुप्रिया ही सुवर्णपदक जिंकणारी भारतातील पहिली दलित महिला ठरली असून तिच्या या विजयाने देशाचा मान उंचावला आहे.
राजस्थानातील साध्या कुटुंबातून आलेल्या सुप्रियाने मर्यादित संधी, आर्थिक अडचणी आणि सामाजिक अडथळ्यांवर मात करत आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलं. तिचं सुवर्णपदक हे केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा क्षण ठरलं आहे.
मात्र, एवढ्या मोठ्या यशानंतरही आजतागायत सुप्रिया जाटवला तसा सन्मान मिळालेला नाही, ही खंत अजूनही कायम आहे. लोकप्रिय खेळांच्या झगमगाटात खरी कर्तबगार खेळाडू दुर्लक्षित राहते, ही वस्तुस्थिती तिच्या प्रवासातून स्पष्ट होते.
सुप्रियाची कहाणी म्हणजे जिद्द, संघर्षावर मात आणि अडथळे मोडून पुढे जाण्याचं प्रेरणादायी उदाहरण. तिचा प्रवास लाखो तरुणींना स्वप्नं पाहण्याचं आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचं धैर्य देतो. सुप्रिया जाटव ही फक्त कराटेची चॅम्पियन नाही, तर वंचित समाजासाठी आशेचं आणि सक्षमीकरणाचं प्रतीक आहे. असे अमोल कांबळे या व्यक्तीने फेसबुक या सोशल मीडियावर पोस्ट टाकुन सन्मान व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे.
Editer sunil thorat




