अण्णासाहेब मगर महाविद्यालयात व्यापार मेळावा संपन्न.; हडपसर.

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या व्यापार मेळाव्याचे उदघाटन रत्ना गिअर प्रायवेट लिमिटेडचे संचालक व उद्योजक प्रकाश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रत्ना गिअर प्रायवेट लिमिटेडचे संचालक व उद्योजक महावीर महाजन उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या व्यापार मेळाव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये बाजारपेठेतील देवाणघेवाण आणि उद्योजकता विकास होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. बिझनेसमधून नफा किती मिळतो यापेक्षा आपण रोजगार निर्माण करतो याचे समाधान मोठे असते. असे मत महावीर महाजन यांनी व्यक्त केले.
व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सातत्य राखणे गरजेचे आहे. शिस्त, गुणवत्ता आणि सातत्य या बाबी व्यवसायात यशस्वी होण्याचे सूत्र आहे. व्यवसायात अपयश येईल या गोष्टीला महत्व देऊ नका. व्यवसायात सकारात्मक दृष्टी बाळगावी. स्वप्न मोठे पहा पण छोट्या व्यवसायातून सुरुवात करा. या क्षेत्रात स्पर्धा मोठी असल्याने गुणवत्ता टिकवता आली पाहिजे. असे प्रतिपादन रत्ना गिअर प्रायवेट लिमिटेडचे संचालक व उद्योजक प्रकाश महाजन यांनी केले.
या मेळाव्यात कॉमर्स, बीबीए, बीबीए(सी.ए) विभागातील विद्यार्थ्यांचे खाद्यपदार्थ, इमिटेशन ज्वेलरी, घरगुती वास्तू, फळे भाजीपाला, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम तसेच इतर उपयोगी वस्तूचे ४५ स्टॉल विक्रीसाठी लावण्यात होते. या व्यापार मेळाव्यात एक लाख रुपयांची उलाढाल झाली. डॉ. नीता कांबळे,डॉ. अशोक ससाणे, प्रा. आशा माने यांनी परीक्षण केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. नीता कांबळे, बीबीए विभाग प्रमुख प्रा. रेश्मा शेख, बीबीए (सी ए) विभाग प्रमुख प्रा. आशा माने उपस्थित होते. प्रा. गौरव शेलार यांनी समन्वयक म्हणून काम केले. प्रा.तृप्ती पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. माहेश्वरी जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर आभार उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी यांनी मानले.



